एसटीचा संप राजकारणामुळे विस्कटला, मराठा आरक्षणाच्या उपोषणात राजकारण नको – प्रवीण दरेकर
कोकणच्या सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येक संघटनांच्या आम्ही बैठका घेतल्या, तिकडे जाऊन मी त्यांच्याशी चर्चा केली होती. मला संपूर्णपणे याची खात्री आहे, की काही ठिकाणी मुद्दामून डोळे बंद करण्याचे काम केलं गेलं आहे. त्याचा या उपोषणाच्या माध्यमातून आम्ही निषेध फक्त करतो.
मुंबई – मराठा (maratha) समाजाच्या अनेक मागण्या अद्याप पुर्ण न केल्याने खासदार संभाजी राजे छत्रपती (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांना राज्यातील अनेक संघटनांनी पाठींबा दर्शविला आहे. तसेच अनेक युवक उपोषणात सहभागी होण्यासाठी मुंबईत (mumbai) दाखल झाले आहेत. त्यामुळे आझाद मैदान परिसरात पोलिसांनी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तिथं भाजपाचे अनेक नेते भेट देत असून एसटीचा संप राजकारणामुळे विस्कटला, मराठा आरक्षणावर उपोषणात राजकारण नको असं प्रवीण दरेकरांनी सांगितलं आहे. तिथं आत्तापर्यंत अनेक मोठ्या नेत्यांनी हजेरी लावली आहे. तसेच महाराष्ट्र सरकारवरती टीका देखील केली आहे. महाराष्ट्रात या उपोषणाचे पडसाद उमटले असून अनेकांनी या उपोषणाला प्रतिसाद दर्शविला आहे. आता सगळ्यांचे लक्ष राज्य सरकारकडे असून राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार हे पाहावे लागेल.
मी राजेंना पाठींबा देण्यासाठी इथं आलो आहे महाराष्ट्रातून सुरूवातीच्या काळात मोर्चे निघाले, त्यावेळी प्रचंड आक्रोश मराठा समाजात होता. मी राजकारणापलीकडे जाऊन यांना मदत करणारे आहे, तसेच सगळ्यांनी यात सहभागी झालं पाहिजे अशी विनंती दरेकरांनी केली. सध्या सगळ्या पक्षातील लोकांनी एकत्र येऊन राजेंना पाठींबा दर्शवायला हवा. तसेच दोघांनीही एकत्र येऊन मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे, सत्तेत असलेल्या सरकारनी फक्त आश्नासनं दिली प्रत्यक्षात काम मात्र शुन्य आहे. तसेच दिलेली10 वसतिगृह कुठे आहेत असा प्रश्न देखील दरेकरांनी तिथं उपस्थित केला. हे सरकार मार्ग काढत नसून प्रश्नांपासून पळ काढत आहे, त्यामुळे 3 तारखेला अधिवेशनात आम्ही आमची भूमिका मांडू असं प्रवीण दरेकरांनी उपोषणस्थळी सांगितलं. मी राजेंना पाठींबा देण्यासाठी इथं आलो आहे. ज्यावेळी आम्ही एसटी संपाला पाठिंबा दर्शविला होता, त्यावेळी त्यात राजकारण घुसलं आणि संप फिस्कटला. परंतु सध्याच्या उपोषणात कुणीही राजकारण आणू अशी विनंती देखील त्यांनी इतर नेत्यांना केली.
मराठ्यांच्या रक्तातच राजकीय भूमिका आहे
कोकणच्या सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येक संघटनांच्या आम्ही बैठका घेतल्या, तिकडे जाऊन मी त्यांच्याशी चर्चा केली होती. मला संपूर्णपणे याची खात्री आहे, की काही ठिकाणी मुद्दामून डोळे बंद करण्याचे काम केलं गेलं आहे. त्याचा या उपोषणाच्या माध्यमातून आम्ही निषेध फक्त करतो. आम्ही मराठा समाजाच्या मागण्या मांडत आहोत भिक मागत नाही आहोत अशी भूमिका प्रसाद लाड यांनी आंदोलनास्थळी मांडली. भाजपाच्या अनेक नेत्यांनी उपोषणाला समर्थन दर्शविलं आहे. राजेंनी उपोषण करू नये यासाठी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी राजेंना फोन केला होता. सध्या सरकार अडचणीत आहे, त्यामुळे तुम्ही उपोषण करू नका.