Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ST Andolan Mumbai : शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांची धडक! परिवहन मंत्र्यांचा कारवाईचा इशारा

पवारांच्या निवासस्थानी झालेल्या आंदोलनानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या आंदोलनाची चौकशी करुन कारवाई करण्याचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलाय.

ST Andolan Mumbai : शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांची धडक! परिवहन मंत्र्यांचा कारवाईचा इशारा
अनिल परब यांचा एसटी कर्मचारी आंदोलकांना कारवाईचा इशाराImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 7:50 PM

मुंबई : मागील जवळपास चार महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला (ST Workers Agitation) आज वेगळं वळण मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. यावेळी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. इतकंच नाही तर आंदोलकांनी पवारांच्या निवासस्थानावर चपला आणि दगडंही फेकले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ सिल्व्हर ओकवर पोहोचले आणि आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं. दरम्यान, या प्रकारानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या आंदोलनाची चौकशी करुन कारवाई करण्याचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलाय.

पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या आंदोलनानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली. एसटी कर्मऱ्यांना कुणी भडकावण्याचा प्रयत्न करतोय. कर्मचाऱ्यांनी कुण्याच्याही बोलण्यात येऊ नये. त्यांच्यावरील कारवाई आम्ही मागे घेतली आहे. एसटी सुरळीत सुरु व्हावी हे सर्वांसाठीच चांगलं आहे. आजच्या घटनेची चौकशी होऊन कारवाई होईल. एसटी तोट्यात असूनही आम्ही कारवाई केली नाही. एसटी कर्मचाऱ्यांवर आम्ही मेस्मा लागू दिला नाही. वारंवार जनतेला वेठीला धरण्याचं काम झालं, असं परब म्हणाले.

‘गृहमंत्री चौकशी करतील आणि कारवाई होईल’

त्याचबरोबर आयच्या घटनेवरुन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नाही, ती चांगली आहे. गृहमंत्री चौकशी करतील आणि कारवाई होईल. आम्ही एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की कामावर रुजू व्हा. सदावर्ते की कोर्ट, कुणाचं ऐकायचं ते कर्मचाऱ्यांनी ठरवावं. 22 तारखेपर्यंत कामावर यावं, त्यानंतर मात्र कारवाई करु, असा इशाराही परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिलाय.

आदित्य ठाकरेंचाही इशारा

शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर आदित्य ठाकरे तातडीने पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले. काही वेळ पवारांशी चर्चा केल्यानंतर आदित्य ठाकरे बाहेर पडले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना विरोधकांना इशारा दिलाय. ‘महाराष्ट्राचं राजकारण कधीही इतकं घाणेरडं झालं नव्हतं. असं कुणाच्याही घरावर आंदोलन झालं नव्हतं. या संपूर्ण प्रकाराची कसून चौकशी होईल आणि कडक कारवाई केली जाईल’, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी आंदोलकांवर कारवाई होणार हे स्पष्ट केलंय.

इतर बातम्या : 

Sharad Pawar: पवारांच्या घराबाहेर तासभर राडा; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी पण…

ST Andolan Mumbai : ज्या भगिनी विधवा झाल्या…, पवारांच्या घरी काढलेल्या आंदोलनावर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया

लाडक्या बहिणींच्या हप्त्यात कपात, 1500 नाही तर मिळणार फक्त 500 रुपये
लाडक्या बहिणींच्या हप्त्यात कपात, 1500 नाही तर मिळणार फक्त 500 रुपये.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 2 मोठ्या घोषणा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 2 मोठ्या घोषणा.
पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड
पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड.
गुंडाची दहशत, केकवर चक्क गुन्ह्यांची कलमं, बर्थ डे सेलिब्रेशनला...
गुंडाची दहशत, केकवर चक्क गुन्ह्यांची कलमं, बर्थ डे सेलिब्रेशनला....
'कचरा समजतो, नंतर येऊन हा काड्या...', दानवेंवर खैरे भडकले, आता थेट...
'कचरा समजतो, नंतर येऊन हा काड्या...', दानवेंवर खैरे भडकले, आता थेट....
हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?.
कराडला धनंजय मुंडेच संपवणार, तृप्ती देसाईंचा दावा, नेमकं काय म्हणाल्या
कराडला धनंजय मुंडेच संपवणार, तृप्ती देसाईंचा दावा, नेमकं काय म्हणाल्या.
फडणवीस गप्प का? सामनातील प्रश्नावर भाजपचं उत्तर, 'सत्तेत यायचंय पण...'
फडणवीस गप्प का? सामनातील प्रश्नावर भाजपचं उत्तर, 'सत्तेत यायचंय पण...'.
मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप
मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप.
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट.