‘उद्धव ठाकरे केवळ नावाला मुख्यमंत्री, कर्तृत्वाने नाही’, एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरुन प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकदा आंदोलनात उडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय.

'उद्धव ठाकरे केवळ नावाला मुख्यमंत्री, कर्तृत्वाने नाही', एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरुन प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 6:18 PM

अहमदनगर : एसटी महामंडळाचं सरकारमध्ये विलीनीकरण होणार नसल्याचं त्रिसदस्यीय समितीच्या अहवालानंतर परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी स्पष्ट केलंय. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन (ST Employees Protest) आता अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकदा आंदोलनात उडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय.

एसटी संपाला पाठिंबा देणारा वंचित बहुजन आघाडी हा पहिला राजकीय पक्ष आहे. अडचणीत याल तेवढं आंदोलन न खेचण्याचा सल्लाही दिला होता. उपटसुंभ कामगार नेत्यांच्या मागे लागल्यानं आज एसटी कामगारांची फसगत झाली. एसटी महामंडळाचा निरोप दोन वेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आला. मात्र, उद्धव ठाकरे हे केवळ नावाला मुख्यमंत्री आहेत, कर्तृत्वाने नाही, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवलाय.

‘चोर, लुटारूंंचे सरकार’

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, एसटी महामंडळाला सातवा वेतन आयोग द्यावाच लागेल. हे चोर, लुटारूंचे सरकार आहे. जे कामगार कामावर रुजू झाले त्यांच्याकडून वसुली सुरू आहे. जेवढे दिवस कामावर गेला नाही त्याची नुकसान भरपाई घेतली जातेय. पगार कपातीमुळे कामावर जावं की नको? असा प्रश्न कामगारांना पडलाय. सरकारला एसटी महामंडळ मोडीत काढायचं आहे. सत्ताधाऱ्यांना स्वत:च्या खासगी बसेस चालवायच्या आहेत. एसटी महामंडळ मोडण्यासाठी संप हे साधन त्यांना मिळालं आहे. यासाठीच सत्ताधारी आमदार, राज्यमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री आणि सत्तेतील राजकीय पक्षांचे अध्यक्ष यांचा प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोपही आंबेडकरांनी केलाय.

फडणीसांच्या आरोपांवर आंबेडकरांची प्रतिक्रिया

दरम्यान, फडणवीसांनी मंगळवारी विधानसभेत टाकलेल्या व्हिडीओ बॉम्बबाबत प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूत फेरफार केली जाऊ शकते. फॉरेन्सिक लॅब जोपर्यंत सत्यता पडताळत नाही तोपर्यंत कुणीही यावर प्रतिक्रिया देऊ नये. हे शिष्टाचाराला धरुन नाही, असं आंबेडकर म्हणाले.

‘मराठा, ओबीसी आरक्षणाप्रमाणे मुस्लिम आरक्षणाचं होणार नाही’

तसंच मुस्लीम आरक्षणाचा विषय आम्ही लावून धरतोय. मुस्लिम आरक्षण लागू करावे असं कोर्टानं मान्य केलंय. सर्वोच्च न्यायालयानंही मुस्लिमांच्या शिक्षणासाठी पाच टक्के आरक्षण रद्द केलेलं नाही. त्यामुळे मराठा, ओबीसी आरक्षणाप्रमाणे मुस्लिम आरक्षणाचं होणार नाही, असंही आंबेडकर म्हणाले.

इतर बातम्या :

फडणवीसांच्या गंभीर आरोपानंतर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण गायब? कार्यालयालाही टाळं!

दुसऱ्याच्या बायकोच्या हातावर पोलीस अधिकाऱ्याचा टॅटू, महिलांच्या सुरक्षेवरून पडळकरांनी काढले वाभाडे

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.