6 खात्यांचा पदभार असलेले राज्यमंत्री जेव्हा अभियानाचे नावच विसरतात, दत्तामामा एवढा विसरभोळेपणा बरा नव्हे!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जवळचे व विश्वासू असलेले राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे काल (शनिनार) भर सभेत अभियानाचे नावच विसरले. तर दुसऱ्या कार्यक्रमात आजची तारीख विसरले व हा सर्व प्रकार भर सभेत व खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर झाला.

6 खात्यांचा पदभार असलेले राज्यमंत्री जेव्हा अभियानाचे नावच विसरतात, दत्तामामा एवढा विसरभोळेपणा बरा नव्हे!
दत्ता भरणे
Follow us
| Updated on: Aug 22, 2021 | 9:56 AM

इंदापूर (पुणे) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जवळचे व विश्वासू असलेले राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Datta Bharane) हे काल (शनिनार) भर सभेत अभियानाचे नावच विसरले. तर दुसऱ्या कार्यक्रमात आजची तारीख विसरले व हा सर्व प्रकार भर सभेत व खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर झाला.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या कामाबद्दल नेहमीच काळजी घेत असतात, मात्र त्यांचे सहकारी असा विसरभोळेपणा करीत असतील तर ही नक्कीच आश्चर्याची बाब आहे. भरणे यांनी यापूर्वीदेखील भरसभेत सोलापूरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले, त्यावरुनही ते चर्चेत राहिले. शेवटी त्यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली.

मंत्रीच अभियानाचे नाव विसरले

महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराजस्व अभियान’ हे सर्वसामान्यांची संबंधित आहे. इतक्या गंभीर विषयावर भरणे यांना या योजनेच्या नावाचा विसर पडला. महाराजस्व अभियान- संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम होता. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होता. मात्र या कार्यक्रमाच्या अभियानाचे नावच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे विसरले.

दत्तामामांनी भाषणात इतरांना या अभियानाचे नाव विचारले. त्यावर तात्काळ स्टेजवरील महसूल अधिकाऱ्यांनी या अभियानाचे नाव सांगितले. मात्र शेवटपर्यंत राज्यमंत्री भरणे यांना हे नाव घेता आले नाही.

दत्तामामा एवढा विसरभोळेपणा बरं नव्हे!

तर दुसऱ्या एका कार्यक्रमात ते चक्क आजची तारीख विसरले व त्यांनी स्टेज समोरील पुढच्या लोकांनाच आजची तारीख किती असा प्रश्न केला.. यापूर्वी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे सरळ व अत्यंत साधेपणा असलेले राज्यमंत्री म्हणून परिचित होते. मात्र अशा विसरभोळेपणामुळे राज्याला त्यांची नवीन ओळख कळालेली आहे कि काय असा प्रश्न निर्माण होत आहे.

भरणे यांच्याकडे सहा अत्यंत महत्त्वाची खाती आहेत, यामध्ये बरीच खाती ही महत्वाची आहेत, त्यामुळे भरणे यांना हा विसरभोळेपणा प्रशासनाच्या दृष्टीने न परवडणारा आहे, अशा प्रतिक्रिया इंदापुरात उमटलेल्या पाहायला मिळाल्या.

(State Minister Datta Bharane forgot the name of the Government campaign )

हे ही वाचा :

दत्तात्रय भरणेंना सोलापुरात फिरू देणार नाही; शिवसेना नेत्यांचा इशारा

लय भारी! दत्ता भरणे चहा प्यायला रस्त्यावर थांबतात तेव्हा…..

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.