चले जाव चले जाव भगतसिंग कोश्यारी चले जाव! मुंबईत राज्यपालांच्या वक्तव्याचे पडसाद
त्याचा परिणाम थेट विधिमंडळाच्या अभिभाषणावरही झालेला पाहायला मिळाला होता. दरम्यान कोश्यारींचं मुंबईबद्दलचं वक्तव्य चांगलंच गाजलंय. या वक्तव्यामुळे त्यांच्यावर बऱ्याच टीका झाल्यात. निषेध म्हणून मुंबईत राज्यपालांविरोधात आंदोलन करण्यात आलंय.
मुंबई: गुजराती आणि मारवाडी माणसांना काढल्यास मुंबई (Mumbai)आर्थिक राजधानीच राहणार नाही, या वक्तव्याने वादात सापडलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari)यांच्यासाठी वाद हे काही नवे नाहीत. त्यांनी पदभार स्वाकीरल्यापासून अनेकदा ते वादात सापडलेले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि राज्यपाल यांच्यातील वाद चव्हाट्यावरही आला होता, इतकेच नाही तर कोर्टानेही या प्रकरणाची दखल घेतली होती. सावित्रीबाई फुले, समर्थ रामदास यांच्याबाबत राज्यपालांनी केलेली वक्तव्येही वादात राहिली. त्याचा परिणाम थेट विधिमंडळाच्या अभिभाषणावरही झालेला पाहायला मिळाला होता. दरम्यान कोश्यारींचं मुंबईबद्दलचं वक्तव्य चांगलंच गाजलंय. या वक्तव्यामुळे त्यांच्यावर बऱ्याच टीका झाल्यात. निषेध म्हणून मुंबईत राज्यपालांविरोधात आंदोलन करण्यात आलंय.