Deepak Kesarkar : राजकारण थांबवा प्रगती करु द्या, केसरकरांची पुन्हा शिवसेनेला विनंती

शिवसेनेतील आमदारांची भूमिका आणि राज्यात झालेले सत्तांतर यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संघटनाच्या दृष्टीने बाहेर पडले आहेत. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे हे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. अशीच भुमिका यापूर्वीच घेतली असती तर ही वेळ आली नसते असेही शिंदे गटाच्या आमदारांकडून सुनावले जात आहेत तर सत्तेमध्ये असताना ठाकरे हे जनतेला किती वेळा भेटले असा सवालही केसरकर यांनी उपस्थित केला आहे.

Deepak Kesarkar : राजकारण थांबवा प्रगती करु द्या, केसरकरांची पुन्हा शिवसेनेला विनंती
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 3:57 PM

मुंबई : आता (State Government) सरकारची स्थापना होऊन 27 दिवस उलटले आहेत. असे असताना रोज उठले की सरकारवर आणि केंद्रावर आरोप करणे हे चुकीचे आहे. यामुळे साध्य काही होणार नाही पण मतभेद वाढून विकास कामांना मात्र खीळ बसते. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप न करता आता विकास कामांवर लक्ष करु द्या असे म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते (Deepak Kesarkar) दीपक केसरकर यांनी (Sanjay Raut) खा. संजय राऊतांवर पुन्हा टीका केली आहे. तुमच्या राजकारणामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रलंबित राहत आहेत. पक्षातील गळती कशी रोखायची हा तुमचा प्रश्न आहे. टीका-टिपण्णी करण्यापेक्षा विकासाचा मुद्दा घेऊन तो मार्गी लावा असा सल्लाही त्यांनी खा. राऊतांना दिला आहे. शिवाय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांनी तीन प्रश्नही विचारले आहेत.

केसरकरांचे पक्षप्रमुखांना तीन प्रश्न

पत्रकार परिषदेदरम्यान दीपक केसरकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना तीन प्रश्न विचारले आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवणार असे आश्वासन दिले होते का ? दुसरा प्रश्न, एकनाथ शिंदे यांनी मला मुख्यमंत्रीपद नको हे पद तुमच्याकडेच राहू द्या..फक्त राष्ट्रवादी-कॉंग्रेसबरोबर युती करु नका असे म्हणाले होते का? आणि तिसरा प्रश्न केसरकरांनी उपस्थित केला आहे की, राहुल शेवाळे असे म्हणाले होते की, पक्षप्रमुख आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये युती संदर्भात चर्चा होती. पण उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन केले आणि तेव्हापासूनच चर्चा ही फिस्कटली असे तीन प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मात्र, यापैकी प्रश्नाचे उत्तर न आल्याने हे सर्व खरे होते की काय अशी शंका आता निर्माण होत असल्याचे केसरकर म्हणाले आहेत.

ठाकरे जनतेला किती वेळा भेटले?

शिवसेनेतील आमदारांची भूमिका आणि राज्यात झालेले सत्तांतर यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संघटनाच्या दृष्टीने बाहेर पडले आहेत. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे हे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. अशीच भुमिका यापूर्वीच घेतली असती तर ही वेळ आली नसते असेही शिंदे गटाच्या आमदारांकडून सुनावले जात आहेत तर सत्तेमध्ये असताना ठाकरे हे जनतेला किती वेळा भेटले असा सवालही केसरकर यांनी उपस्थित केला आहे. मात्र, आता सरकारची स्थापना झाली असून आरोप-प्रत्यारोप न करता शिंदे गटाला काम करु द्यावे असाच मुद्दा त्यांच्या पत्रकार परिषदेतील होता.

हे सुद्धा वाचा

संजय राऊतांवरही टीका

रोज सकाळी उठून केंद्रावर आणि राज्यातील महत्वाच्या नेत्यांवर टीका केली जात आहे. ही महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा नाही. केंद्र आणि राज्याचे संबंध चांगले राहिले तरच विकासकामे होणार आहेत. मात्र, आपल्याच पक्षातील नेत्यांवर खालच्या स्तराला जाऊन टीका करायची हे राज्यासाठी योग्य नसल्याचे म्हणत केसरकरांनी राऊतांवर हल्लाबोल केला. तर केवळ त्यांच्या बोलण्यामुळे हे अंतर वाढत गेल्याचेही ते म्हणाले आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.