Vishwajeet Kadam: साहेब काय चाललंय?; विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर विश्वजीत कदमांना हसू आवरेना
विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी सांगलीतल्या (Sangli) एका शाळेला अचानक भेट दिली. त्यावेळी शाळेच्या आवारात काही विद्यार्थी (Student)जमले होते. त्यातील मोजक्या विद्यार्थ्यांनी विश्वजीत कदम यांना थेट प्रश्न विचारला 'साहेब काय चाललंय'. त्यावर विश्वजीत कदम यांना हसू आवरेना झाल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.
सांगली – विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी सांगलीतल्या (Sangli) एका शाळेला अचानक भेट दिली. त्यावेळी शाळेच्या आवारात काही विद्यार्थी (Student)जमले होते. त्यातील मोजक्या विद्यार्थ्यांनी विश्वजीत कदम यांना थेट प्रश्न विचारला ‘साहेब काय चाललंय’. त्यावर विश्वजीत कदम यांना हसू आवरेना झाल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. विश्वजीत कदम यांच्यासोबत असलेल्या एका कार्यकर्त्याने हा व्हिडीओ त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. त्यानंतर विश्वजीत कदम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद सु्ध्दा साधला आहे. शाळकरी मुलं प्रश्न अनेक प्रश्व विचारतात. परंतु आज त्यांनी चक्क विश्वजीत कदम यांना सुध्दा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे अनेकांना आच्छर्य वाटले आहे. विशेष म्हणजे विश्वजीत कदम यांनी सुध्दा त्यांच्या ग्रामीण भागातल्या भाषेत उत्तर दिल्याने विद्यार्थी सुध्दा हसत आहेत.
Video : Vishwajeet Kadam यांना विद्यार्थ्याचा प्रश्वावर हसू आवरेना #vishwajitkadam #sangli #students pic.twitter.com/Xw4T4cfopQ
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 19, 2022
नेमकं काय आहे व्हिडीओ
शाळेच्या आवारात दुकानाच्य़ा समोर मुलांचा एक ग्रुप उभा आहे. शाळकरी मुलं प्राथमिक शिक्षण घेत असावीत असं त्यांच्या बोलण्यावरून वाटतंय. विश्वजीत कदम समोर येताचं विद्यार्थ्यांनी काय चाललंय साहेब असं म्हटलं. हे ऐकून सगळे हसत आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विश्वजीत कदम यांच्याशी हातमिळवणी केली आहे. विश्वजीत कदम म्हणतात तुमचं काय चाललंय निवांत…काय निवांत…शाळा सुरू झाली का ?…होय झाली…सुट्याबी पडल्या आमचं पेपरबी झालं…दोन वर्ष सुट्टी झाली की मगं…दोन वर्ष शाळा बंद होती ना…या फोटू काढूया एक…उभे राहून फोटो काढतात…या व्हिडीओची सध्या सगळीकडे चर्चा आहे.
विद्यार्थ्यांनी अस्सल ग्रामीण भाषेत संवाद साधला
विश्वजीत कदम हे पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. महाराष्ट्राचे कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक व्यवहार आणि अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री आहेत. माजी काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे पुत्र आहेत. विश्वजीत कदम यांनी व्यवस्थापनात बीई, एमबीए, पीएचडी आणि हार्वर्ड विद्यापीठातून व्यवस्थापन आणि शिक्षण या विषयात लीडरशिपचा अभ्यास केला आहे. लहान मुलांनी असा अनेकदा राजकीय व्यक्तींशी संवाद साधला आहे. काही राजकारण्यांना विद्यार्थ्यांनी संवादादरम्यान अशा गोष्टी विचारल्या आहेत की, त्याची त्यांना दखल घ्यावी लागली आहे. आज अचानक झालेला हा संवाद विनोदी आहे. अस्सल ग्रामीण भागात संवाद साधला आहे.