‘या’ तीन महिला नेत्यांच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या नट्याही फिक्या; प्रत्येकीचा राजकीय प्रवास रंजक
नवनीत राणा, डिंपल यादव आणि नुसरत जहां यांच्या राजकीय कारकिर्दीबरोबरच त्यांच्या वैयक्तिक जीवनाची झलकही या लेखात आहे. त्यांच्या यशोगाथा, संघर्ष आणि राजकारणातल्या प्रवासाचा आढावा घेतला आहे. या महिलांनी आपल्या कर्तृत्वाने राजकारणात एक वेगळा ठसा उमटवला आहे.
आज आपण 21व्या शतकात राहत आहोत. या शतकात महिलांना समान दर्जा मिळतोय. महिलाही आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर जीवनातील विविध क्षेत्रावर आपला अमिट ठसा उमटवत आहेत. मग जमिनीपासून आकाशापर्यंतच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटलेला आहे. एवढेच नव्हे तर राजकारणातही महिलांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे. केवळ कर्तृत्वच सिद्ध केलं नाही तर देशाची मोठी सेवा करण्याचं कामही महिलांनी केलं आहे. आज राजकारणात अनेक महिला वावरत आहेत. त्यातील तीन महिला राजकारणी तर अथक संघर्ष करून पुढे आल्या आहेत. एवढंच नव्हे तर त्यांच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या आहेत.
1. नवनीत राणा
नवनीत राणा या अमरावतीच्या माजी खासदार आहे. सर्वात सुंदर महिला राजकारण्यांमध्ये त्यांचं स्थान अत्यंत वरचं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेली अत्यंत डॅशिंग महिला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. विचारांची पक्की बैठक, अमोघ वक्तृत्व आणि दांडगा लोकसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. 2019 मध्ये त्यांनी संसदेत प्रवेश केला. शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा 36 हजार मतांनी पराभव करून त्या विजयी झाल्या होत्या.
नवनीत राणा यांचा जन्म 1986 मध्ये मुंबईत झाला. त्यांना अभिनयाची आवड होती. त्यांनी काही सिनेमात कामही केलं आहे. पण नंतर त्यांनी राजकारणाचा रस्ता धरला. त्यांचे पती रवी राणा हे आमदार आहेत. घरातच राजकीय वारसा असल्याने त्यांनी राजकारणात येऊन यश संपादन केलं. नवनीत राणा या मूळच्या पंजाबच्या. त्यांचे वडील लष्करात होते.
View this post on Instagram
2. डिंपल यादव
सुंदर नेत्या यादीतील दुसरे नाव आहे डिंपल यादव यांचे आहे. उत्तर प्रदेशातील राजकारणातील मोठं नाव म्हणून डिंपल यादव यांच्याकडे पाहिलं जातं. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव हे त्यांचे पती आहेत. तर त्यांचे सासरे मुलायम सिंह यादव हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री होते. घरातच राजकारण असल्याने डिंपल यादव यांना राजकारणात स्थिर होण्यास फार वेळ लागला नाही. डिंपल यादव कन्नौज मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. डिंपल यादव आणि अखिलेश यादव यांचा प्रेमविवाह झालेला आहे. डिंपल यादव अत्यंत साध्या राहतात. त्या मेकअप सुद्धा करत नाहीत. मात्र, निवडणुकीचा काळ जवळ येताच त्या समाजवादी पार्टीच्या मदतीसाठी घराबाहेर पडतात आणि प्रचाराची धुरा उचलतात.
View this post on Instagram
View this post on Instagram
3. नुसरत जहाँ
नुसरत जहाँ हे नाव आता पश्चिम बंगालच्या राजकारणात सर्वात चर्चिलं जाणारं नाव आहे. सर्वात सुंदर महिला राजकारणी म्हणूनही त्यांची ओळख आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बशीरहाट मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर विजय मिळवला होता. नुसरत जहाँ अभिनेत्री असून त्या राजकारणातही सक्रिय असतात. नुसरत यांचा जन्म 1990 मध्ये कोलकात्यात झाला होता. त्यांनी 2019 मध्ये बिझनेसमन निखिल जैन यांच्याशी विवाह केला. पण त्यांचा विवाह दीर्घकाळ टिकला नाही. सध्या त्या आपल्या मुलासोबत राहतात आणि राजकारणात सक्रिय आहेत.