Uday Samant Attack : उदय सामंतांवरील हल्ला ही तर उत्सफूर्त प्रतिक्रिया; सुभाष देसाईंकडून हल्ल्याचं समर्थन

| Updated on: Aug 03, 2022 | 11:56 AM

Uday Samant Attack : सुभाष देसाई यांनी सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्रं सादर केलं आहे. त्यातून शिंदे गटांचे सर्व दावे फेटाळण्यात आले आहेत. फुटीर गटाने सरकार स्थापन करण्याचा जो प्रयत्न केलेल्या आहे. अध्यक्षांची निवड, बहुमत जे सिद्ध करून दाखवलं आहे.

Uday Samant Attack : उदय सामंतांवरील हल्ला ही तर उत्सफूर्त प्रतिक्रिया; सुभाष देसाईंकडून हल्ल्याचं समर्थन
उदय सामंतांवरील हल्ला ही तर उत्सफूर्त प्रतिक्रिया; सुभाष देसाईंकडून हल्ल्याचं समर्थन
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: शिंदे गटाचे बंडखोर आमदार उदय सामंत (uday samant) यांच्यावर करण्यात आलेल्या हल्यावरून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. या हल्ल्याचा उदय सामंत, आमदार तानाजी सावंत यांनी निषेध नोंदवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी तर या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे. राज्यात अशा प्रकारचे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे, असं सांगतानाच हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तर, शिवसेना नेते सुभाष देसाई (subhash desai) यांनी या हल्ल्याचं समर्थन केलं आहे. ही तर कार्यकर्त्यांची उत्सुफूर्त प्रतिक्रिया आहे, असं सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. देसाई यांनी हे विधान केल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिवसेना आता बंडखोरांबाबत अधिक आक्रमक झाल्याचंही सांगितलं जात आहे.

शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उदय सामंत यांच्यावरील हल्ला ही उत्सफूर्त प्रतिक्रिया आहे, असं सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. सामंत यांच्यावर हल्ला झाल्यानंतर शिवसेनेतून ही पहिलीच प्रतिक्रिया आली आहे. त्यामुळे या प्रतिक्रियेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

हे सुद्धा वाचा

कोर्टाचा आदेश शिरसावांद्य

दरम्यान, सुभाष देसाई यांनी सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्रं सादर केलं आहे. त्यातून शिंदे गटांचे सर्व दावे फेटाळण्यात आले आहेत. फुटीर गटाने सरकार स्थापन करण्याचा जो प्रयत्न केलेल्या आहे. अध्यक्षांची निवड, बहुमत जे सिद्ध करून दाखवलं आहे. त्याला आम्ही आक्षेप घेतला आहे. मात्र, न्यायालयाचे आदेश शिरसावंद्य असतात. त्यामुळे सर्व प्रकारचे सहकार्य न्यायव्यवस्थेला करत असतो. जिथे जिथे अन्याय होईल तिथे दाद मागणारच, असंही त्यांनी म्हटलं आहे.

सहा जणांना अटक

दरम्यान, काल उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ल्या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. संभाजी थोरवे, सूरज लोखंडे, संजय मोरे आणि बबन थोरात आणि इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. बबन थोरात यांनी चिथावणीखोर भाषण केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी जो रूट ठरवून देण्यात आला होता, त्या रूटने उदय सामंत न जाता दुसऱ्या रूटने उदय सामंत यांची गाडी गेली, अशी माहिती भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगनाथ कळसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.