Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तयारी सुजीतसिंहांची, घोषणा दरेकरांची, भाजपचे एका रात्रीत निर्णय, सुभाष देसाईंचा टोला

मी विधानपरिषद विरोधीपक्ष सुजीतसिंह ठाकूर यांच्याबद्दल भाषणाची तयारी केली होती, अखेर प्रवीण दरेकर यांच्या नावाची घोषणा झाली, असा टोला सुभाष देसाई यांनी लगावला.

तयारी सुजीतसिंहांची, घोषणा दरेकरांची, भाजपचे एका रात्रीत निर्णय, सुभाष देसाईंचा टोला
Follow us
| Updated on: Dec 16, 2019 | 1:49 PM

नागपूर : विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाल्यानंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव विधीमंडळात ठेवण्यात आला. मात्र सुजीतसिंह ठाकूर यांच्या अभिनंदनाची तयारी केली असताना, निवड मात्र प्रवीण दरेकरांची झाली, हल्ली रात्री अनेक निर्णय होतात, असे चिमटे शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी भाजपला काढले (Subhash Desai on Pravin Darekar) . नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान देसाई विधानपरिषद सभागृहात बोलत होते.

‘आधी प्रश्न पडला होता की अभिनंदन कोणाचं करायचं? हल्ली रात्री अनेक निर्णय होतात, बदलतात, घटना घडतात. मला विधिमंडळाकडून लेखी माहिती मिळाली की सुजितसिंह ठाकूर यांचे नाव विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते म्हणून निश्चित झाले आहे. म्हणून मी त्यांच्याबद्दल भाषणाची तयारीही केली होती, अखेर प्रवीण दरेकर यांच्या नावाची घोषणा झाली’ असा टोला सुभाष देसाई यांनी लगावला.

मेट्रो कारशेडसाठी रातोरात झालेली झाडांची कत्तल तसंच भाजप सरकार कोसळण्याआधी अजित पवार यांच्या सोबतीने मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांनी भल्या पहाटे घेतलेली शपथ या घटनांचा संदर्भ देसाईंच्या भाषणाला होता.

भाजप आमदार सुरेश धस, भाई गिरकर, सुरजीतसिंह ठाकूर यांची नावंही विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपदासाठी चर्चेत होती. मात्र शिवसेना व्हाया मनसेतून भाजपमध्ये आलेल्या प्रवीण दरेकर यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागली आहे. सुरजितसिंह ठाकूर यांची विधानपरिषदेते प्रतोद, तर भाई गिरकर यांची विधीमंडळ गटाचे उपनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नागपुरातील हिवाळी अधिवेशनाला आज 16 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. हे अधिवेशन केवळ 6 दिवस चालणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.

कोण आहेत प्रवीण दरेकर? 

  • प्रवीण दरेकर हे भाजपचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार आहेत.
  • प्रवीण दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात
  • मनसेमध्ये असताना दरेकर हे राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते
  • मनसेकडून निवडणूक लढताना  2014 च्या विधानसभा निवडणुकीत दरेकर यांचा मागाठाणे विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला.
  • त्यानंतर दरेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना विधानपरिषदेवर पाठवून आमदार केलं.

फडणवीस आणि दरेकर

भाजपकडून विरोधी पक्षनेतेपदाची धुरा आता देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्याकडे असेल. देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत तर प्रवीण दरेकर (Subhash Desai on Pravin Darekar) हे विधानपरिषदेत आपला आवाज घुमवतील.

'ना जबरदस्ती ना धक्काबुक्की... दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध'
'ना जबरदस्ती ना धक्काबुक्की... दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध'.
HSRP नंबर प्लेट म्हणजे काय? तुमच्याकडच्या वाहनासाठी बंधनकारक तर नाही न
HSRP नंबर प्लेट म्हणजे काय? तुमच्याकडच्या वाहनासाठी बंधनकारक तर नाही न.
'त्या' वक्तव्यावर गृहराज्यमंत्री स्पष्टच बोलले, 'मी पण एका मुलीचा बाप'
'त्या' वक्तव्यावर गृहराज्यमंत्री स्पष्टच बोलले, 'मी पण एका मुलीचा बाप'.
आरोपी दत्ता गाडेला थोड्याच वेळात शिवाजीनगर कोर्टात हजर करणार
आरोपी दत्ता गाडेला थोड्याच वेळात शिवाजीनगर कोर्टात हजर करणार.
'कितीही डुबक्या मारा गद्दारीचा शिक्का...', ठाकरेंचा शिंदेंना पलटवार
'कितीही डुबक्या मारा गद्दारीचा शिक्का...', ठाकरेंचा शिंदेंना पलटवार.
मुख्यमंत्री कार्यालय उडवून देण्याची धमकी देणारा 'तो' मेसेज कुठून आला?
मुख्यमंत्री कार्यालय उडवून देण्याची धमकी देणारा 'तो' मेसेज कुठून आला?.
महिलांनो घाबरू नका...स्वारगेट प्रकरणानंतर राज्य महिला आयोग ॲक्शन मोडवर
महिलांनो घाबरू नका...स्वारगेट प्रकरणानंतर राज्य महिला आयोग ॲक्शन मोडवर.
हिरकणी कक्षात मद्यपींच्या पार्ट्या, पालिकेच्या शाळेत चाललंय काय?
हिरकणी कक्षात मद्यपींच्या पार्ट्या, पालिकेच्या शाळेत चाललंय काय?.
परळीट 109 अज्ञात मृतदेह सापडले; बजरंग सोनवणेंचा खळबळजनक दावा
परळीट 109 अज्ञात मृतदेह सापडले; बजरंग सोनवणेंचा खळबळजनक दावा.
'मराठी माणसासाठी केलेली 4 कामं मनसेनं दाखवावी', भाजप नेत्याचं चॅलेंज
'मराठी माणसासाठी केलेली 4 कामं मनसेनं दाखवावी', भाजप नेत्याचं चॅलेंज.