Sudhir Joshi Death : बाळासाहेब ठाकरेंचे सहकारी, सच्चे शिवसैनिक सुधीर जोशी यांचं निधन; शिवसेनेवर शोककळा

ज्येष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी यांचं आज दु:खद निधन झालं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी आणि सच्चे शिवसैनिक अशी सुधीर जोशी यांची ओळख होती. वयाच्या 81 व्या वर्षी राहत्या घरी त्यांचं निधन झालं.

Sudhir Joshi Death : बाळासाहेब ठाकरेंचे सहकारी, सच्चे शिवसैनिक सुधीर जोशी यांचं निधन; शिवसेनेवर शोककळा
सुधीर जोशी निधन
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 5:46 PM

मुंबई : ज्येष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी (Sudhir Joshi) यांचं आज दु:खद निधन झालं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे सहकारी आणि सच्चे शिवसैनिक अशी सुधीर जोशी यांची ओळख होती. वयाच्या 81 व्या वर्षी राहत्या घरी त्यांचं निधन झालं. सुधीर जोशी यांना जानेवारीमध्येच कोरोनाची बाधा (Corona Positive) झाल्यामुळे मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आलं. त्यानंतर आज त्यांची प्राणज्योत मालवली. सुधीर जोशी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते. शिवसेना पक्ष संघटनेत त्यांची महत्वाची भूमिका राहिली.

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर माधव देशपांडे, शाम देशमुख, बळवंत मंत्री हे प्रमुख नेते बाळासाहेबांशी जोडले गेले. पुढे मनोहर जोशी आणि सुधीर जोशी या दोघांनी शिवसेना वाढवण्यासाठी बाळासाहेबांसोबत मोठं काम केलं. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांसोबत शिवसेना नेते म्हणून त्यांनी काम केलं. 1972 मध्ये ते मुंबईचे महापौर झाले. पुढे पदवीधर मतदारसंघाचे पहिले आमदार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि युतीच्या काळात शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

सुधीर जोशी यांची राजकीय कारकीर्द

सुधीर जोशी हे 1968 साली प्रथम नगरसेवक झाले. मुंबई महानगरपालिका गटनेता, विरोधी पक्षनेता म्हणून ते राहिले. 1973 मध्ये मुंबई महानगरपालिकेचे महापौर झाले तेव्हा ते सर्वांत तरुण महापौर होते. 1968 पासून ते विधान परिषद सदस्य होते. 1992-93 या दरम्यान ते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते होते. तेव्हा त्यांनी राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पाची पाहणी करून त्यासंदर्भात अहवाल निष्कर्ष पुस्तिकेद्वारे शासनाकडे सादर केला. शिवशाही सरकारात ते जून 1995 ते मे 1996 या कालखंडात प्रथम महसूल मंत्री होते. नंतर 1996 ते 1999 पर्यंत शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत होते. मंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय लोकाभिमुख ठरले आहेत.

सुधीर जोशी आणि मनोहर जोशींबाबत सांगितला जाणारा किस्सा

राज्याच्या राजकारणात सुधीर जोशी आणि मनोहर जोशी या बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळच्या सहकाऱ्यांबाबत एक किस्सा सांगितला जातो. 1995 च्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु होता. त्यावेळी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेमुळे काँग्रेस सरकारच्या पायाखालची वाळू घसरली होती. तर दुसरीकडे बाळासाहेबांनी मतदारांना आपल्याच उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं होतं. बाळासाहेबांनी ‘आई जगदंबेला आता सत्ता मिळाली नाही तर पुन्हा दर्शनाला येणार नाही’, असं बजावलं होतं. तर पुन्हा मतं मागायला येणार नाही अशा शब्दात बाळासाहेब मतदारांना आवाहन करत होते.

त्या निवडणुकीत अखेर शिवसेना आणि भाजपच्या प्रयत्नांना यश आलं. या निवडणुकीत काँग्रेस 80 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला. तर शिवसेना 73 आणि भाजपला 65 जागा मिळाल्या. युतीच्या मिळून आमदारांची संख्या 138 वर पोहोचली. तेव्हा राज्यात शरद पवार यांच्या पुलोदनंतर दुसऱ्यांदा बिगर काँग्रेसी सरकार येणार हे निश्चित होतं. पण बहुमत नसल्यामुळे अपक्ष आमदारांना सोबत घेणं अपरिहार्य होतं. अशावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी आपण कुठलंही सत्तापद भूषवणार नसल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न शिवसैनिकांसह संपूर्ण राज्याला पडला होता. मुख्यमंत्रीपदासाठी मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आली. तेव्हा सर्व आमदार आणि समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. तेव्हा ‘मला उठ म्हटलं की उठणारा आणि बस म्हटलं की बसणारा मुख्यमंत्री हवाय. मुख्यमंत्री कोणीही होवो, सत्तेचा रिमोट कंट्रोल माझ्याच राहात राहणार’ असं बाळासाहेबांनी जाहीर केलं होतं.

मनोहर पंतांना डावलून सुधीर जोशी महापौर!

बाळासाहेबांनंतर शिवसेनेत मुख्यमंत्रीपदासाठी सुधीर जोशी आणि मनोहर जोशी अशी दोन नावं चर्चिली जात होती. तेव्हा सुधीर जोशी म्हणजे साधा माणूस आणि मनोहर जोशी म्हणजे चतुर माणूस असं या दोघांबाबत बोललं जात होतं. तत्पूर्वी 1973 मध्ये जेव्हा मुंबईच्या महापौर पदाची जबाबदीर देण्यासाठी नावांची चाचपणी सुरु होती. तेव्हा बाळासाहेबांनी ज्येष्ठ असणाऱ्या मनोहर जोशींना डावलून अवघ्या बत्तीस वर्षीय सुधीर जोशींना महापौर केलं होतं. तेव्हापासून सुधीर जोशी यांची शिवसेनेतील स्थान वाढलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची माळही सुधीर जोशींच्याच गळ्यात पडणार अशी चर्चा सुरु होती. खुद्द मनोहर जोशीही म्हणाले होते की, बाळासाहेब मुख्यमंत्रीपदासाठी सुधीर जोशींचाच विचार करत होते. मात्र, बहुमताचा आकडा गाठता आला नसल्यामुळे कुणीतरी चतुर माणूस मुख्यमंत्रीपदावर असायला हवा असं बाळासाहेबांना वाटत होतं.

..आणि बाळासाहेबांनी मनोहर जोशींच्या नावाची घोषणा केली

अपक्षांच्या बळावर सरकार चालवणं जिकरीचं असल्यामुळे मनोहर जोशी यांच्यासारखा धूर्त, खाचखळगे माहिती असणारा माणूस योग्य ठरेल. ते यशस्वीपणे सरकार चालवतील असं बाळासाहेब यांनी निकटवर्तीयांनाही सांगितलं होतं. दुसऱ्या दिवशी शिवसेना भवनात नेता निवडीची बैठक सुरु झाली होती. तरी अजूनही ठोस निर्णय झाला नव्हता. मात्र, बाहेर सुधीर जोशी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. इतकंच नाही तर बाळासाहेब सुधीर जोशी यांचंच नाव जाहीर करतील अशा बातम्याही आल्या होत्या. मात्र, बैठकीत बाळासाहेबांनी मनोहर जोशी यांच्या नावाला पसंती दिली आणि सुधीर जोशी यांना मनोहर पंतांच्या सरकारमध्ये महसूल मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. (हा किस्सा पत्रकार प्रकाश आकोलकर यांच्या जय महाराष्ट्र पुस्तकात सांगितला गेला आहे.)

इतर बातम्या :

Video – Amravati | अमरावती महापालिकेची आमसभा ठरली वादळी, सफाई कंत्राटावरून तुफान राडा

Photo | नातीच्या मांडवात घराला आग; भिंत खचली, चूल विझली, संसार खाक…!

मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.