मुंबई – “जीएसटी (GST) दिला जातो, पैसे देणे बाकी आहे याचा अर्थ राज्य सरकारने कामे थांबवायची असे होत नाही. या सरकारची अडचण ही आहे, की यांना काम करता येईना. मग जीएसटी आला नाही असे म्हणायचे का ? फक्त महाराष्ट्राचा (Maharshtra) जीएसटी थांबला आहे का? इतर राज्याचे मुख्यमंत्री रडताना पाहिलेत का? हे सरकार बेईमानी करत आले आहे. हे पहिले सरकार असे आहे की, यांनी रोजगार हमी योजनेचे पैसे दिलेले नाहीत. तसेच सरकारने अनुदान देखील दिलेले नाही. सध्याचं सरकार गरिबाला केंद्रबिंदू मानून चालवत नाही. विशेष म्हणजे मंत्रालयात (Mantralay) आज निर्णय घेतले जात नाही. कॅबिनेटमध्ये मोहाच्या दारूला विदेशी म्हणा असा निर्णय होतो” अशी टीका सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती केली.
देव करो यांना सायकलवर फिरायला लागो. पेट्रोल डिझेलची किंमत इतर राज्ये कमी करत आहेत. त्यांच्याकडून काही तरी शिका असा टोला देखील मुंनगटीवार यांनी लगावला. तसेच अनेक नेत्यांना अडकवण्यासाठी पोलिसांचा दुरुपयोग राज्यात केला जात आहे. हे सरकार कधीही जनतेच्या धक्क्याने जाऊ शकतं. जे आमदारांचा अपमान करतात त्यांनी माफी मागावी. इथे येणारे आमदार घोडे आहेत का? तुम्ही विकाऊ आहात आमदारांवर शंका उपस्थित करू नका. भाजपला त्यांचा उमेदवार निवडून आणता येईल हा विश्वास आहे. मग तुमचा हट्ट का?, मी प्रत्येक आमदारांना सांगू शकतो की यांनी तुमचा अवमान केला आहे.
शिवसेना काँग्रेसची बी टीम आहे. सर्जिकल स्ट्राईकवर टीका करणारी शिवसेना सर्जील उस्मानी आणि सावरकरांचा अवमान झाला तेव्हा एक शब्द बोलली नाही. काँग्रेसने कोणाला उमेदवारी दिली, त्यांनी अनेकदा वादग्रस्त भाषण केली. ज्याने संविधानाला विरोध केला त्याला उमेदवारी दिली. ती जागा आम्ही का मागे घेऊ, ती जागा आम्ही लढवणार आहोतच. अपक्ष काय तुमच्या तिकिटावर निवडून आले आहेत का?, तुम्हाला पाठिंबा दिला तर ते काय आयुष्य भर तुमच्या सोबत राहणार असे वचन दिले आहे का.
ते भाजपच्या बाजूने पण येतील ना, तुम्ही आता तुमचे आमदार सांभाळा अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवरती केली.