Sudhir Mungantiwar : अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचं मुनगंटीवारांनी सांगितलं कारण, त्यावर महापौरांचं मोठं वक्तव्य

पहिला फोन कुणी करायचा यावर सगळं येऊन थांबलं आहे. तसेच मानपानात सगळं येऊन अडकलं आहे असं दीपक केसरकर यांनी वक्तव्य केलं आहे. फोन कोण करणार याबाबत आम्हाला माहिती नाही.

Sudhir Mungantiwar : अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचं मुनगंटीवारांनी सांगितलं कारण, त्यावर महापौरांचं मोठं वक्तव्य
अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचं मुनगुंटीवारांनी सांगितलं कारणImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 12:38 PM

मुंबई – राष्ट्रवादीच्या काही आमदारांना सोबत घेऊन अजित पवारांनी (Ajit Pawar) बंड केलं होतं. पण ते बंड थांबवण्यात शरद पवारांना (Sharad Pawar) यश आलं होतं. हे अवघ्या महाराष्ट्रासह देशाने पाहिलं. अचानक पहाटे झालेला शपथविधी सगळ्यांनी टिव्हीवरती पाहिला होता. तेव्हापासून हा किस्सा अनेकदा चर्चीला जातो. किंवा एखादं उदाहरण द्यायचं झालं तर लोक ते उदाहरण देतात. त्यावर आजही चर्चा होते. दीड दिवसात त्यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadanvis) राजीनामा द्यावा लागला होता. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी त्या विषयावर इतक्या दिवस मनात असलेलं वाक्य पहिल्यांदा माध्यमासमोरआणलं आहे. ज्यावेळी ते एका खासगी वृत्तवाहिणीला मुलाखत देत होते. त्यावेळी त्यांनी शिवसेना आमच्याशी युती केल्यानंतर ज्या पद्धतीने वागत होती. त्यामुळे रागाच्याभरात आम्ही अजित पवार यांच्याशी गेलो होतो असं मुनगंटीवार म्हणाले.

विधानसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचे फोटो वापरून आम्ही निवडणूक लढलो

हे प्रकऱण झाल्यानंतर लोक कुणाला काय म्हणतात हे सगळ्यांना माहित आहे. त्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचे फोटो वापरून आम्ही निवडणूक लढलो. परंतु ज्यावेळी निकाल हाती आला. त्यावेळी शिवसेनेकडून आश्चर्यकारक वक्तव्ये केली गेली. ती आम्हाला सहन न झाल्याने रागाच्याभरात आम्ही अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांनी उत्तर देताना तुम्हाला कोणता राग आला होता का ? तुम्ही शरद पवार यांच्यासोबत गेले. शरद पवार त्यांच्यासोबत असल्यामुळे आम्ही फोन करण्याचा प्रश्नचं येत नाही असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. सध्या शिवसेना-भाजप युती आहेच. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सगळेचं आमदार आमच्यासोबत आहेत. ते सगळे शिवसेनेचे आमदार आहेत. आम्ही रोज एकमेकांच्या संपर्कात आहोत. त्यामुळे सध्या भाजप आणि सेनेची युती आहे. विशेष म्हणजे आमच्याकडून उद्धव ठाकरे यांना फोन जाण्याचा प्रश्न येतचं नाही. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना जबरदस्ती हात वर करुन मुख्यमंत्री बनवले असंही मुनगुंटीवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

सगळ्या गोष्टीवर महापौरांचं मोठं वक्तव्य

पहिला फोन कुणी करायचा यावर सगळं येऊन थांबलं आहे. तसेच मानपानात सगळं येऊन अडकलं आहे असं दीपक केसरकर यांनी वक्तव्य केलं आहे. फोन कोण करणार याबाबत आम्हाला माहिती नाही. पण आमच्या पक्षप्रमुखांचा जो निर्णय असेल तो आम्ही मान्य करू. मात्र भाजपकडून इतक्या छोट्याशा गोष्टीवरुन महाराष्ट्राला दावणीला धरु नये. त्यावेळी राष्ट्रवादी सोबत शपथविधी घेणं तुम्हाला मान्य होतं. त्यावेळचं सगळं राजकारण लोकांना टिव्हीवर पाहिलं आहे. तुम्ही जनतेला काय येडे समजता काय असा सवाल त्यांनी भाजपच्या नेत्यांना केला आहे. गेलेली लोक परत येतील अशी आम्हाला आशा आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.