एकदा नेत्याला भेटलं की कवच कुंडल भेटतात, मग कायदाही काही करु शकत नाही : सुधीर मुनगंटीवार

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनेता सोनू सुद याने घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीवरुन चांगलेच टोले लगावले आहेत.

एकदा नेत्याला भेटलं की कवच कुंडल भेटतात, मग कायदाही काही करु शकत नाही : सुधीर मुनगंटीवार
Follow us
| Updated on: Jan 13, 2021 | 3:57 PM

मुंबई : भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनेता सोनू सुद याने घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीवरुन चांगलेच टोले लगावले आहेत. एकदा नेत्याला भेटलं की भेटणाऱ्याला त्या नेत्याच्या आशिर्वादाचे कवच कुंडल भेटतात, मग कायदाही त्या व्यक्तीचं काही करु शकत नाही, असं मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलंय. तसेच कुणीही शरद पवारांना प्रत्यक्ष भेटूनच आपली बाजू मांडायची असते का? असा सवालही केला (Sudhir Mungantiwar criticize Sharad Pawar and Uddhav Thackeray over Sonu Sood meet).

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “कोविडच्या काळात सोनू सूदवर काही आरोप झाले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ते गायबही झाले. एकदा नेत्याला भेटलं आणि त्याचा आशीर्वादाचा कवच कुंडल तुम्हाला भेटला, तर मग कायदा सुद्धा तुमचं काही करु शकत नाही. शरद पवारांना भेटले ठीक आहे, पण पवारांना आपली बाजू भेटून मांडायची असते का? आपली बाजू मांडायची असेल तर महापालिकेकडे मांडली पाहिजे. कोर्टासमोर मांडली पाहिजे.”

सरकार चुकत असेल, तर सुप्रीम कोर्ट सरकारविरोधात निर्णय देईल : सुधीर मुनगंटीवार

यावेळी मुनगंटीवारांनी कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय यावरही मत व्यक्त केलं. “कोर्टाने स्टे दिला आहे, तर आता योग्य पद्धतीने चर्चा होईल. दोन्ही बाजू मांडल्या जातील. सुप्रीम कोर्टावर सर्वांचा विश्वास आहे आणि जर सरकार कुठे चुकत असेल, तर सुप्रीम कोर्ट सरकारच्या विरोधात निर्णय देईल. शेतकरी सिंधू बॉर्डर सोडायला तयार नसतील, तर असा आग्रह धरणे चूक आहे,” असं मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं.

“बर्ड फ्लूला देवाच्या भरवशावर सोडता येत नाही”

सुधीर मुनगंटीवार यांनी बर्ड फ्लूवर बोलताना सरकारला इशारा दिलाय. ते म्हणाले, “उद्या पक्षी अभयारण्यात बर्ड फ्लू पसरला, तर गंभीर परिस्थिती निर्माण होईल. सरकारने पक्षी मित्रांशी बोललं पाहिजे. बर्ड फ्लूला देवाच्या भरवशावर सोडता येत नाही.”

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ईडीने ड्रग्ज प्रकरणी चौकशीला बोलावल्यानंतर मुनगंटीवार यांनी यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “आता जनतेनं बघायचं आहे की सत्य काय, असत्य काय, धर्म काय, अधर्म काय, कोण खरा, कोण खोटा? कायदा आहे आणि कायदा आपला काम करतो. जर तसं झालं नाही तर आपल्याला काही विशिष्ट लोकांवर कायदा लागूच होत नाही असा एक कायदा करावा लागेल. असं झालं तर मग प्रश्नच सुटतो. संविधानाच्या आधारावर जर एखादी संस्था काम करत असेल आणि त्यात काही निष्पन्न होत असेल तर त्या संदर्भात त्यांनी कारवाई करावी. त्यासाठी राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देणं योग्य नाही.”

पाहा आखाडा, दररोज दु. 4 वा टीव्ही 9 मराठीवर

हेही वाचा :

मुंबई महापालिकेकडून माझ्यावर भेदभाव; सोनू सूदचा न्यायालयात दावा

Sonu Sood Sharad Pawar | अभिनेता सोनू सूदनं शरद पवारांची घेतली भेट

हायकोर्टाचा सोनू सूदला मोठा दिलासा, 13 जानेवारीपर्यंत कारवाई न करण्याचे BMC ला आदेश

Sudhir Mungantiwar criticize Sharad Pawar and Uddhav Thackeray over Sonu Sood meet

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.