‘आम्ही जेलमध्ये गेलो, तर तुम्हालाही जेलमध्ये टाकू’ राऊतांच्या वक्तव्यावर मुनगंटीवारांचा थेट प्रहार, काय म्हणाले?

Sudhir Mungantiwar on Sanjay Raut : आमच्या चुका तुम्ही पोटात घाला आणि तुमच्या चुका आम्ही पोटात घालू, असं कसं चालेल, असा सवाल मुनगंटीवारांनी संजय राऊतांना विचारलाय. राउतांची पत्रकार परिषद म्हणजे शिवसेना संपवण्याची पत्रकार परिषद आहे, अशीही टीका त्यांनी केली

'आम्ही जेलमध्ये गेलो, तर तुम्हालाही जेलमध्ये टाकू' राऊतांच्या वक्तव्यावर मुनगंटीवारांचा थेट प्रहार, काय म्हणाले?
मुनगंटीवार यांचं राऊतांना प्रत्युत्तर
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 10:24 AM

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊतांनी दिल्लीत पत्रकार परिषद (Sanjay Raut Press Conference) घेतली. ईडीसह (ED) केंद्र सरकारवर घणाघाती आरोप केले. त्यांच्या या आरोपांना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही खरपूस समाचार घेतालय. आम्ही जेलमध्ये गेलो तर तुम्हालाही जेलमध्ये टाकू या संजय राऊतांच्या वक्तव्यावर तीव्र संताप व्यक्त करत सुधीर मुनगंटीवार यांनी निशाणा साधलाय. आमच्या चुका तुम्ही पोटात घाला आणि तुमच्या चुका आम्ही पोटात घालू, असं कसं चालेल, असा सवाल मुनगंटीवारांनी संजय राऊतांना विचारलाय. राउतांची पत्रकार परिषद म्हणजे शिवसेना संपवण्याची पत्रकार परिषद आहे, अशीही टीका त्यांनी केली आहे. दरम्यान, सामान्य माणसाचं हित पाहण्याऐवजी तुम्ही पत्रकार परिषद घेऊन सौदेबाजी करत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं राजकारण (Maharashtra Politics) कोणत्या दिशेनं चाललंय, याबाबत नाराजी व्यक्त करत सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊतांवर टीका केली.

आणखी काय म्हणाले राऊत?

संजय राऊत यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी टीव्ही 9 मराठीला फोनवरुन प्रतिक्रिया देताना म्हटलंय, की….

संजय राऊतांची पत्रकार परिषदेत एक वक्तव्य केलं. ते म्हणाले की आम्ही जेलमध्ये गेलो तर तुम्हालाही जेलमध्ये टाकू. याचा अर्थ काय? म्हणजे आमच्या तुम्ही पोटात घाला आणि तुमच्या चुका आम्ही पोटात घालू, असं कसं चालेल? सामान्य माणूस कोणताही स्वार्थ न बाळगता मतदान करतो, आणि तुम्ही पत्रकार परिषद घेऊन तुम्ही सौदेबाजी करता…हे आश्चर्यजनक आहे… महाराष्ट्र कोणत्या दिशेनं चाललंय.. सुडाच्या राजकारणाचा विषय जाऊ दे हो..जेव्हा भुजबळांना अटक केली, ते सुडाचं राजकारण होतं..आता तु्म्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलाय…याचा काय अर्थ? धमक्या द्यायच्या आणि धमकावलंय…एवढंच सुरु आहे. यातून शिवसेनेचा जो दबदबा होता, तो संपत चाललाय. बाळासाहेबांची शिवसेना संपवणारी ही पत्रकार परिषद आहे… 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण, म्हणणारी शिवसेना आता 100 टक्के राजकारण घुसली आहे..

पाहा व्हिडीओ –

राऊतांनी पत्रकार परिषदेत केलेली 10 मोठी वक्तव्य कोणती?

संजय राऊत यांनी एका पत्रातून केंद्रीय तपाय यंत्रणांवर आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्राचा अपमान केल्याचा ठपका ठेवत मोदींवर निशाणा साधताना राऊतांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलंय..

1 लेटरबॉम्ब टाकत केलेले गंभीर आरोप हा ट्रेलरही नाही, तुम्ही बघाल पुढे पुढे काय काय समोर येतं ते!

2. फडणवीसांना कळलं असेल, मी काय सांगतोय ते. नंतर अशी अवस्था करु की नागपुरातही जायची सोय उरणार नाही.

3. केंद्राकडून केंद्रीय तपाय यंत्रणाचा वापर केला जात असून ईडीच्या मदतीनं क्रिमिनल सेंडिकेट चालवतात आणि मनी लॉड्रिंग हे पुराव्यानिशी दाखवून देऊ

4. दादरा नगर हवेलीत शिवसेना जिंकल्यानंतर यांना जास्त राग आला आणि त्यातूनच कारवाया वाढल्यात

5. मी पुढची पत्रकार परिषद सेना भवनात घेणार, त्यानंतर ईडी कार्यालयाबाहेर हजारो लोकांसमोर पत्रकार परिषद घेणार

6. सगळ्यात जास्त ईडीचे खटले महाराष्ट्रातच कसे काय.. बिहार आणि यूपी, दिल्लीत कसे नाहीत?

7. ‘माझ्या मुलीच्या लग्नात ईडीने फुलवाल्याला उचललं आणि गन पॉईन्टवर धमकावत म्हणाले ‘अंदर डाल देंगे!’

8. तुम्ही कोण आहात, मुंबईत शिवसेना दादा आहे, मुंबईत शिवसेना दादागिरी करेल!

9. कुणीतरी बेवड्यासारखा उठतो, खोटे पुरावे तयार करतो आणि कारवाई करा अशी मागणी करतो

10. जास्त बोलत नाही, ईडीच्या कार्यालयात काय चाललंय. याचे सूत्रधार कोण आहेत, हे लवकरच मी तुम्हाला सांगेन..

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.