मजबूत शिवसेना पक्षप्रमुख ते मजबूर मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंचा वर्षभराचा प्रवास: सुधीर मुनगंटीवार
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राठोड यांच्या प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ( Sudhir Mungantiwar Uddhav Thackeray )
मुंबई: पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या अडचणी वाढणार की कमी होणार याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहेत. सध्या संजय राठोड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी गेले आहेत. दुसरीकडे भाजप नेते संजय राठोड प्रकरणी आक्रमक झाले आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आक्रमक झाले आहेत. मजबूत शिवसेना पक्षप्रमुख ते मजबूर मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंचा वर्षभराचा प्रवास झालाय, अशी टीका मुनगंटीवारांनी केली आहे. (Sudhir Mungantiwar slams Uddhav Thackeray over Sanjay Rathod issue)
मुख्यमंत्र्यांबद्दल आदर कमी होईल…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ती अपेक्षा नव्हती. मजबूत शिवसेना पक्षप्रमुख ते मजबूर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा वर्षभराचा प्रवास झाला आहे. एक मित्र म्हणून त्यांच्याबद्दल आमच्या मनात असलेला आदर कमी होणार आहे, असं सुधीर मुनंगटीवार म्हणाले. महाराष्ट्र पुरोगामी विचारावर पुढे जाणारं राज्य आहे. ऑडिओ क्लिप आहेत, त्यातील आवाज हुबेहुब आहे. खोट्या ऑडिओ क्लिप कोणी तयार करत असतील तर पोलीस विभागानं कारवाई केली पाहिजे. जे लोक ऑडिओ क्लिप तयार करतात, त्यांच्या मुसक्या आवळा. जे लोक क्लिप पसरवणारे पकडू शकत नाहीत ते लोक आतंकवादी, दहशतवादी पकडू शकतील का? 15 हजार कोटी रुपये आपण यासाठी खर्च करतो का? असा सवाल सुधीर मुनंगटीवार यांनी केला आहे. याप्रकरणामुळे राज्यात चुकीचा संदेश गेला आहे.
जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर
अहमदाबादमधील सर्वात मोठ्या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना त्यांची तुलना थेट हिटलरशी केली आहे. “हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वत:चं नाव दिलं होतं”, असा टोला आव्हाडांनी मोदींना लगावला आहे. तर, सुधीर मुनंगटीवार यांनी आव्हाड यांना प्रत्युत्तर देताना, यांची स्मरणशक्ती 24 तासाच्या वरती राहत नाही, नाव देण्याचा निर्णय गुजरात क्रिकेट असोसिएशननं केला. नरेंद्र मोदींनी केलेला नाही, असं म्हटलं.
उद्धव ठाकरेंवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा दबाव
काँग्रेस-राष्ट्रवादीचे मंत्री खासगीत संजय राठोड विषयावरून नाराज असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालीय. संजय राठोड शिवसेनेचे मंत्री आहेत, त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून सीएम ठाकरे यांनी निर्णय घ्यावा, असाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं दबाव निर्माण केलाय. संजय राठोडप्रकरणी मुख्यमंत्री अधिवेशन सुरू होण्याआधी निर्णय घेतील, अशी अपेक्षा काँग्रेस राष्ट्रवादी नेत्यांनी व्यक्त केल्यानं राजकीय वर्तुळात या चर्चांना उधाण आलंय. सह्याद्री अतिथिगृहावर मंत्रिमंडळाची बैठक झाली, पण या बैठकीत संजय राठोड यांच्याविषयी कोणतीच चर्चा झालेली नाही. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते संजय राठोड प्रकरणात शिवसेनेवर नाराज असल्याची चर्चा आहे.
वनमंत्री संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, अभय मिळणार की राजीनामा घेणार?#ForestMinisterSanjayRathod #uddhavthackeray #poojachavancase #poojachavansuicidecasehttps://t.co/YLR4GUAttL
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
संबंधित बातम्या:
एकदा नेत्याला भेटलं की कवच कुंडल भेटतात, मग कायदाही काही करु शकत नाही : सुधीर मुनगंटीवार
भाजपने आधीच सुधीर मुनगंटीवारांकडे सर्व जबाबदारी दिली असती तर…? उदय सामंतांचं मोठं विधान
(Sudhir Mungantiwar slams Uddhav Thackeray over Sanjay Rathod issue)