राहुल झोरी, मुंबईः मुंबईतील मंत्रालय परिसरात (Mantralay) एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची आज कॅबिनेट बैठक (Cabinet meeting) होती. दुपारच्या वेळी या तरुणाने मंत्रालयात लावण्यात आलेल्या संरक्षक जाळीवर उडी मारली. अनेकदा मंत्रालयाच्या इमारतीवरून नागरिकांनी आंदोलन करण्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न (Attempt of suicide) केलेला आहे.
त्यामुळेच अशा आत्महत्या थांबवण्यासाठी मंत्रालय परिसरात संरक्षक जाळी लावण्यात आली आहे. मात्र आज याच जाळीवर एका तरुणाने उडी मारली.
या तरुणाची मागणी नेमकी काय आहे, हे तूर्तास समजू शकलेले नाही.
तरुणाला बाहेर काढण्यासाठी पोलीस आणि कर्मचाऱ्यांनी खूप प्रयत्न केले. या तरुणाला बाहेर काढण्यात यंत्रणेला यश आलंय. आत्महत्येच्या प्रयत्नात तरुणाच्या डोळ्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.