‘जे किराणा दुकानदार वाईन विक्री करतील ती दुकानं बंद करणार’, इम्तियाज जलील यांच्यानंतर सुजय विखेंचाही इशारा

खासदार सुजय विखे पाटील यांनी सुरुवातीपासूनच राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री सांगोत किंवा राज्य सरकार शिर्डी मतदारसंघात किराणा दुकानात वाईन विक्री होऊ देणार नाही. जे किराणा दुकानदार वाईन विक्री करतील ती दुकाने मी स्वत: बंद करणार, असा इशाराच सुजय विखे यांनी दिलाय.

'जे किराणा दुकानदार वाईन विक्री करतील ती दुकानं बंद करणार', इम्तियाज जलील यांच्यानंतर सुजय विखेंचाही इशारा
वाईन विक्री निर्णयावरुन सुजय विखेंचा इशारा
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 10:27 PM

शिर्डी : ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) एका निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. किराणा दुकानात (Grocery store) आणि सुपर मार्केटमध्ये दारु विक्री करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला भाजपसह अनेक सामाजिक संघटना आणि नागरिकांनी तीव्र शब्दात विरोध केलाय. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांनी तर ठाकरे सरकारला बेमुदत संपाचा इशाराच दिला आहे. तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jalil) यांनी ज्या किराणा दुकानात वाईन विक्रीसाठी ठेवली जाईल ते दुकान फोडण्याचा इशारा दिलाय. जलील यांच्या पाठोपाठ आता भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe Patil) यांनीही ज्या किराणा दुकानात वाईन विक्री केली जाईल ते दुकान मी स्वत: बंद करणार, असा इशारा दिला आहे. ते राहता येथे लायन्स क्लबच्या कार्यक्रमात बोलत होते.

खासदार सुजय विखे पाटील यांनी सुरुवातीपासूनच राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री सांगोत किंवा राज्य सरकार शिर्डी मतदारसंघात किराणा दुकानात वाईन विक्री होऊ देणार नाही. जे किराणा दुकानदार वाईन विक्री करतील ती दुकाने मी स्वत: बंद करणार, असा इशाराच सुजय विखे यांनी दिलाय. ज्या विषयात समाजहित नाही त्याला मी विरोध करत राहणार. अनेक शाळा आणि महाविद्यालयातील तरुण-तरुणींचे प्रश्न मी सोडवले आहेत. जे मंत्री आहेत, सत्ताधारी आहेत त्यांच्या घरातील महिलांसोबत वाईट वेळ येऊ देणार नाही. परमेश्वर करतो तशी वाईट वेळ येऊ नये. मात्र, ती वेळ शिर्डी मतदारसंघात येण्याची वाट आपण पाहणार नाही, असंही सुजय विखे म्हणाले.

खासदार इम्तियाज जलील यांचाही ठाकरे सरकारला इशारा

वाईन विक्रीच्या धोरणाविरोधात राज्य सरकारला इशारा देताना खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. तुमच्यात हिंमत असेल तर औरंगाबादमधल्या दुकानात वाईन ठेवून दाखवा. एका चांगल्या कामासाठी आम्हाला कायदे मोडावे लागले तर आम्ही पुढे मागे पाहणार नाही, असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईनचं धोरण आणलं, असं महाविकास आघाडी म्हणत असेल तर काही दिवसांनी दुकानात चरस आणि गांजाही ठेवाल. तेसुद्धा शेतातच पिकतं की? असा सवाले खासदार इम्तियाज जलील यांनी केला. एवढंच असेल तर दुधाचे उत्पादन आणि विक्रीच्या वाढीसाठी सरकार प्रोत्साहन का देत नाही, असा प्रश्नही जलील यांनी उपस्थित केला होता.

औरंगाबादेत एमआयएमचं आंदोलन

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देणाऱ्या निर्णयाचा औरंगाबाद एमआयएम पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला. गुरुवार, दिनांक 3 फेब्रुवारी रोजी क्रांती चौकात आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देत निदर्शने करण्यात आली. यावेळी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी फलक हातात धरून सरकारविरोधात घोषणा दिल्या. आघाडी सरकारच्या सुपर मार्केटमध्ये विक्री निर्णयाचा एमआयएम औरंगाबादच्या वतीने क्रांती चौकात आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देत निदर्शने करण्यात आली. यावेळी या आमच्या कार्यकर्त्यांनी फलक हातामध्ये धरून सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

इतर बातम्या :

Video : “शिवसेना आणि ‘हाता’च्या नादाला लागल्यापासून ‘घड्याळा’ची वेळ चुकतेय!”, जयंत पाटलांची मिश्किल टिप्पणी, उपस्थितांमध्ये हशा

PM Modi Speech in Parliament: इन्हे आईना मत दिखाओ, वो आईना भी तोड देंगे, मोदींचा शेरो शायरीतून काँग्रेसवर घणाघाती हल्ला

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.