स्वतःच्या विचारांवर टिकून न राहणारे सामान्य माणसांसोबत कसे राहणार? सुनील केदार यांचा ज्योतिरादित्य शिंदे यांना टोला

काँग्रेस नेते आणि राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी भाजपचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे (Sunil Kedar criticize Jyotiraditya Shinde over Madhya Pradesh Assembly Election).

स्वतःच्या विचारांवर टिकून न राहणारे सामान्य माणसांसोबत कसे राहणार? सुनील केदार यांचा ज्योतिरादित्य शिंदे यांना टोला
Follow us
| Updated on: Oct 04, 2020 | 5:27 PM

वर्धा : काँग्रेस नेते आणि राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी भाजपचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे (Sunil Kedar criticize Jyotiraditya Shinde over Madhya Pradesh Assembly Election). स्वतःच्या विचारांवर टिकून न राहणारे सामान्य माणसांसोबत कसे उभे राहणार? असा सवाल केला. सुनील केदार यांच्या खांद्यावर पक्षाने नवी जबाबदारी सोपवली आहे. त्यांची मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा पोटनिवडणुकीत 2 जिल्ह्यांच्या समन्वयक पदावर नियुक्ती करण्यात आली. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सुनील केदार यांची नियुक्ती केली. मुरैना आणि ग्वाल्हेर या दोन्ही जिल्ह्यांचे निवडणूक समन्वयक म्हणून सुनील केदार काम पाहणार आहेत. यानंतर ते वर्धा येथे पत्रकारांशी बोलत होते.

सुनील केदार म्हणाले, “कुणी एखादा नेता काँग्रेसबाहेर गेला म्हणून काँग्रेसची विचारधारा संपत नाही. कमलनाथ यांनी मला जी संधी दिली त्याचं सोन करेल. अनेकांनी काँग्रेस संपवण्याचा प्रयत्न केला. जी माणसं स्वतःच्या विचारधारेशी प्रामाणिक राहू शकत नाही ते सर्वसामान्य माणसांसोबत कसे राहतील?”

उत्तर प्रदेशमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल सुनील केदार यांनी चिंता व्यक्त केली. “या देशात नेहमीच महिलांचा सन्मान होत आला आहे. महिलांना आदर्श मानलं जात आहे. असं असताना महिलांवर अत्याचार होत असतील, तर दोषींना शिक्षाही झाली पाहिजे. याच गोष्टींना अनुसरून उत्तरप्रदेश येथे कारवाईची अपेक्षा आहे. उत्तर प्रदेश येथे सत्ताधारी लोक महत्व देत नसतील, पण तिथे मूळ विचारधारा असलेले भारतीय योग्य दक्षता घेऊन निर्णय घेतील,” असंही सुनील केदार यांनी सांगितलं.

दरम्यान, काँग्रेसच्या मध्य प्रदेशमधील सरकारला सुरुंग लावत भाजपवासी झालेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासाठी आगामी मध्य प्रदेश निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. काँग्रेसकडून देखील या निवडणुकीत ज्योतिरादित्य शिंदे यांचा वचपा काढण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्यासाठी पूर्ण ताकद लावली जाईल. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

सुनील केदार ग्वाल्हेरचा गड लढवणार, ज्योतिरादित्य शिंदेंना थेट आव्हान

भाजप सरकार सत्तेच्या मस्तीत, ते कधी कोसळतील हे त्यांनाही कळणार नाही : सुनिल केदार

Sunil Kedar | दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांना कोरोनाची लागण, ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार

संबंधित व्हिडीओ :

Sunil Kedar criticize Jyotiraditya Shinde over Madhya Pradesh Assembly Election

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.