‘संजय राऊतांनी 1 रुपयाचाही भ्रष्टाचार केला नाही, देशातल्या कोणत्याही वकिलाला विचारा…’
मलासुद्धा ऑफर होती. मी तर संजय राऊत यांचा भाऊ.. त्यांना 50 खोके तर मला किती ऑफर असेल? पण मी खोक्यांपुढे झुकलो नाही, असं वक्तव्य सुनिल राऊत यांनी कार्यक्रमादरम्यान केलं.
मुंबईः शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक रुपयाचाही भ्रष्टाचार (Corruption) केलेला नाही. त्यांची काहीच चूक नाही. देशातला कुठलाही वकीलाला विचारा. माझ्याकडून चार्जशीट घेऊन जा… यांच्यावर एफआयआर होऊ शकतो, असं कुणीही म्हणणार नाही. पण जोपर्यंत भाजपचं राज्य आहे, हे होऊ शकत नाही… असं वक्तव्य संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत (Sunil Raut) यांनी केलंय. विक्रोळीतील एका कार्यक्रमात ते काल रात्री बोलत होते.
संजय राऊत शंभर टक्के बाहेर येणार .त्यांनी कितीही अन्याय करू देत… ते बाहेर येतील आणि भाजपच्या अत्याचाराविरोधात शिवसेनेचा आवाज बुलंद करण्यासाठी ते लवकर बाहेर येतील.
संजय राऊतांच्या कानात एकानं सांगितलं, त्या वेळी कॉम्प्रमाइज केलं असतं तर बरं झालं असतं.. त्यावेळी राऊतांनी उत्तर दिलं. मी बाळासाहेबांना वरती जाऊन काय तोंड दाखवलं असतं? गद्दार म्हणून? की निष्ठावंत शिवसैनिक म्हणून?
40 आमदार जे मिंधे लोक गेलेत त्यांनी शिवसेना संपुष्टात आणली, धनुष्यबाण मिटवलं… असं वक्तव्य सुनिल राऊत यांनी केलंय.
भारतीय जनता पार्टीला काहीही झालं तरी सत्ता पाहिजे. ज्यांचे 120 आमदार निवडून आले, त्यांचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री का झाले?, असा सवाल त्यांनी केला.
बिनपक्षाचा मुख्यमंत्री…. एकनाथ शिंदे… या मुख्यमंत्र्याच्या हाताखाली देवेंद्र फडणवीस काम करणार का? तर तसं नसून एकनाथ शिंदंच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेना संपवण्याचं काम भाजप करतंय, असा आरोप सुनिल राऊत यांनी केलाय.
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांचा बंगला सोडावा लागला तेव्हा महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेच्या डोळ्यात अश्रू होते. संजय राऊतांना जेव्हा पोलीस घेऊन जात होते, तेव्हा माझअया ८४ वर्ष वय असलेल्या आईच्या डोळ्यात अश्रू होते… हे महाराष्ट्र विसरणार नाही, असं वक्तव्य सुनिल राऊत यांनी केलंय.
मलासुद्धा ऑफर होती. मी तर संजय राऊत यांचा भाऊ.. त्यांना 50 खोके तर मला किती ऑफर असेल? पण मी खोक्यांपुढे झुकलो नाही, असं वक्तव्य सुनिल राऊत यांनी कार्यक्रमादरम्यान केलं.