संजय राऊतांच्या कानात ‘तो’ काय बोलला….? कॉम्प्रमाइजचा राऊतांनी सांगितलेला किस्सा पाहा Video
एकनाथ शिंदे हे बिनपक्षाचे मुख्यमंत्री असल्याची टीका सुनिल राऊत यांनी केली. तसेच एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेना संपण्याचा भाजपचा कट असल्याचंही सुनिल राऊत म्हणाले.
मुंबईः शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) शंभर टक्के बाहेर येतील आणि शिवसेनेचा आवाज पुन्हा एकदा बुलंद होईल, असा विश्वास राऊतांचे बंधू सुनिल राऊत (Sunil Raut) यांनी व्यक्त केला. विक्रोळीतील एका कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान, कॉम्प्रमाइज करण्यासाठी भाजपने वेळोवेळी दबाव टाकला तरीही राऊत झुकले नाहीत, असंही सुनिल राऊतांनी सांगितलं. ते म्हणाले, आज मी त्यांच्याशी बोलत होतो. तेव्हा एकानं त्यांच्या कानात सांगितलं… साहेब आपने कॉम्प्रमाइज किया होता तो आज तुम घर पे होते….’
यानंतर संजय राऊतांनीही संबंधित व्यक्तीला उत्तर दिल्याचं सुनिल राऊतांनी सांगितलं. ते म्हणाले, त्यांनी उत्तर दिलं. मी जर कॉम्प्रमाइज केलं असतं, वरती जाईल आणि बाळासाहेबांना काय तोंड दाखवलं असतं? गद्दार म्हणून की निष्ठावंत शिवसैनिक म्हणून? मी निष्ठावंत म्हणून वरती जाईन. गद्दार म्हणून तोंड दाखवणार नाही… हे ४० आमदार गेलेत… मिंधे लोक गेलेत… त्यांनी शिवसेना संपुष्टात आणली. धनुष्यबाण मिटवलं… असं वक्तव्य सुनिल राऊत यांनी केलं.
पुढे बोलताना सुनिल राऊत म्हणाले, ‘ त्यांनी कितीही अन्याय-अत्याचार करू देत, संजय राऊत शंभर टक्के बाहेर येतील. महाराष्ट्रात शिवसेनेचा आवाज बुलंद करतील.
सुनिल राऊतांनी सांगितलेला किस्सा पाहा..
एकनाथ शिंदे हे बिनपक्षाचे मुख्यमंत्री असल्याची टीका सुनिल राऊत यांनी केली. तसेच एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेना संपण्याचा भाजपचा कट असल्याचंही सुनिल राऊत म्हणाले. यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः उपमुख्यमंत्री पदी राहून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलंय, असंही ते म्हणाले.