“अहो शिंदेसाहेब, केंद्रातील 2 मंत्रिपदं आणि राज्यपालपदं एवढंच?, जरा अजून मोठी मागणी करा!”

राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे...

अहो शिंदेसाहेब, केंद्रातील 2 मंत्रिपदं आणि राज्यपालपदं एवढंच?, जरा अजून मोठी मागणी करा!
Follow us
| Updated on: Nov 16, 2022 | 3:10 PM

रत्नागिरी : राष्ट्रवादी खासदार सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना टोला लगावला आहे. केंद्रात दोन मंत्रीपद आणि दोन राज्यपाल पदांच्या शिंदे गटाचा बालहट्ट भाजपने पुरवावा. भारतीय जनता पार्टीला फार मोठा आधार शिंदे गटाकडून मिळाल्याचं भासवलं जातंय. केंद्रात दोन मंत्रीपदांची मागणी ही सुद्धा कमी आहे. वास्तविक अधिक असली पाहिजे. राज्यपाल पदासाठी शिंदे गटाकडे लायक असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे यापेक्षा जास्तची मागणी शिंदे गटानी केली पाहिजे, असं म्हणत तटकरेंनी (Sunil Tatkare) शिंदेंना टोला लगावलाय.

देवेंद्र फडणवीस शिंदेगटाला मार्गदर्शन करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यावरही तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक राजकीय पक्षाला दुसऱ्या राजकीय पक्षाचे नेते मार्गदर्शन करणार आहे, हे भारी गंमतीदार उदाहरण आहे. या मार्गदर्शनाची गरज एवढ्यासाठीच भासली असेल कि 100 दिवसात वेगवेगळी वक्तव्य झाली. संस्कृती सोडून विधानं झाली.त्यामुळे या साऱ्याचा उबक दवेंद्र फडणवीस यांना आला असेल. म्हणूनच फडणवीस यांना मार्गदर्शनाची आवश्यकता वाटली असेल, असं तटकरे म्हणालेत.

एकनाथ शिंदे सर्व आमदारांची मनस्थिती ठीक करण्यासाठी हतबल झालेत. त्यामुळे त्यांनी आमदारांसाठी फडणवीसांचं मार्गदर्शन ठेवलं असेल. या चिंतन शिबीराचा लाभ सर्व आमदारांना मिळल आनंदाची गोष्ट आहे.पण या मार्गदर्शनाची गरज कुणाला वाटली? शिंदे गटाला कि फडणवीसांना? हे मला माहित नाही, असंही तटकरे म्हणालेत.

जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीस यांची जरूर भेट घ्यावी. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांचं मत आणि मन समजावून घ्यावं. या साऱ्या प्रकरणात त्यांनी तटस्थ म्हणुन योग्य भूमिका घ्यावी, असंही तटकरे म्हणालेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.