Shivsena Case | शिंदे-ठाकरेंमधील वादात जिथे न्यायाची आशा, त्या सुप्रीम कोर्टात आज काय घडणार?

दावे-प्रतिदावे आणि राजकीय घडामोडींचा झालेला घटनात्मक गुंता येत्या काही दिवसातच सोडवला जाईल असेही म्हटले जात आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय.

Shivsena Case | शिंदे-ठाकरेंमधील वादात जिथे न्यायाची आशा, त्या सुप्रीम कोर्टात आज काय घडणार?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 8:22 AM

संदीप राजगोळकर, नवी दिल्ली : निवडणूक आयोगाचं  (Election commission)आयुध हाती मिळाल्यानंतर शिवसेना नाव आणि चिन्ह मिळालेला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं गट अधिकच आक्रमक झाला आहे. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. यात शिंदे गटाच्या प्रतोद यांच्याकडून सर्व शिवसेना आमदारांना व्हिप बजावण्यात आले.त्यामुळे ठाकरे गटाच्या नेत्यांचं टेंशन वाढलंय. दुसरीकडे शिंदेंची सेना राज्यातील महत्त्वाची शिवसेना कार्यालयांवर ताबा मिळवत आहे. शिंदेंकडे पक्षाचं बळ आल्याने राज्यातील अनेक नेते आता एकनाथ शिंदेंच्या गटात जाण्यास इच्छुक असल्याची हवा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आजच्या सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीत नेमकं काय होणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. सुप्रीम कोर्टात पाच सदस्यीय घटनापीठासमोर शिवसेनेतील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन दिग्गजांदरम्यान हा महत्त्वाचा खटला सुरु आहे. आज सलग तिसऱ्या आठवड्यात ही सुनावणी सुरु होत आहे.

थोड्याच वेळात सुरुवात

सत्तासंघर्षाच्या सुनावणीला आज सलग तिसऱ्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास घटनापीठासमोर युक्तिवादाला सुरुवात होईल. मागील दोन आठवडे ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. आजच्या सुनावणीत शिंदे गटाचे वकील नीरज कौल आणि हरिश साळवे हे युक्तिवाद करण्याची शक्यता आहे.

मागील आठवड्यात काय घडलं?

सत्तासंघर्षाच्या मागील आठवड्यात झालेल्या सुनावणीत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची ठाकरे गटाची मागणी सुप्रीम कोर्टाने अमान्य केली. आयोगाच्या कोणत्याही निर्णयावर स्थगिती देण्यास सरन्यायाधीशांनी नकार दिला. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयालाच आव्हान दिलंय. यासंबंधीच्या याचिकेवर दोन आठवड्यांनी सुप्रीम कोर्टातच सुनावणी होईल, असे कोर्टाने म्हटलं. तसेच ठाकरे गटातील आमदारांवर व्हिपचं उल्लंघन केल्यास कोणत्याह प्रकारची कारवाई केली जाणार नाही, असं आश्वासन शिंदे गटाच्या वकिलांकडून देण्यात आलं.  शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल या गोष्टी कायम राहतील. काउंटर अॅफिडेव्हिट दाखल करायची असल्यास २ आठवड्यात करावी, अशा सूचनाही कोर्टाने दिल्या आहेत.

अंतिम सुनावणी होणार?

राज्यात अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच सत्तासंघर्षाच्या सुनावणी अभावी रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टातील शिवसेना केसचा निकाल लवकरात लवकर लागावा, अशी जनतेची इच्छा आहे.शिंदेंची शिवसेना आणि भाजपच्या ‘नैसर्गिक’ युतीतून हे सरकार बनल्याचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगत आहेत. मात्र खुद्द एकनाथ शिंदे यांच्या पात्रतेचाच खटला सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्याने या सरकारवरदेखील अस्थिरतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे देशातील सर्वात मोठ्या सत्तापेचावर लवकरात लवकर सुनवाणी व्हावी, अशी सर्वांची इच्छा आहे. दावे-प्रतिदावे आणि राजकीय घडामोडींचा झालेला घटनात्मक गुंता येत्या काही दिवसातच सोडवला जाईल असेही म्हटले जात आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.