फडणवीस सरकारचं काऊंटडाऊन सुरु, उद्या बहुमताची अग्निपरीक्षा!

 शिवसेनेतर्फे कपिल सिब्बल, काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे अभिषेक मनू सिंघवी, अजित पवार यांच्यातर्फे मणिंदर सिंग, भाजपतर्फे मुकुल रोहतगी आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात आपआपली बाजू मांडली.

फडणवीस सरकारचं काऊंटडाऊन सुरु, उद्या बहुमताची अग्निपरीक्षा!
Follow us
| Updated on: Nov 26, 2019 | 12:10 PM

नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस सरकारचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांना उद्या म्हणजे 27 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करावं (Supreme Court Verdict On Maharashtra Floor Test ) लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने फडणवीसांना 30 तासांची मुदत दिली आहे. ही बहुमत चाचणी खुल्या पद्धतीने होईल म्हणजेच गुप्त होणार नाही, त्याचं लाईव्ह चित्रीकरण करा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने (Supreme Court Verdict On Maharashtra Floor Test ) दिले. बहुमत चाचणीसाठी हंगामी अध्यक्षांची (प्रोटेम स्पीकर) नियुक्ती करा, असेही निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले.

सुप्रीम कोर्टाच्या निकालातील महत्त्वाचे मुद्दे

  • 27 नोव्हेंबर संध्या. 5 पर्यंत बहुमत सिद्ध करा
  • गुप्त मतदान नको
  • लाईव्ह चित्रीकरण करा
  • बहुमत चाचणीसाठी हंगामी अध्यक्षांची (प्रोटेम स्पीकर) नियुक्ती करा

 बहुमत सिद्ध करुन दाखवू – चंद्रकांत पाटील 

कोर्टाच्या निकालाचा आदर करतो, उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी आम्ही तयार आहोत, आम्ही बहुमत सिद्ध करुन दाखवू – चंद्रकांत पाटील 

हंगामी अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोण कोण?

सूत्रांच्या माहितीनुसार, हंगामी विधानसभा अध्यक्षपदासाठी (प्रोटेम स्पीकरसाठी)  17 विधानसभा सदस्यांची नावं सचिवालयातून राज्यपालांना सुपूर्द करण्यात आली आहेत. यामध्ये भाजपचे हरिभाऊ बागडे, काँग्रेसचे  बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील, भाजपचे बबनराव पाचपुते, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, के सी पाडवी (काँग्रेस, शहादा), भाजपचे कालिदास कोलंबकर, भाजपचे सुधीर मुनगंटीवार, भाजपचे विजय कुमार गावित, भाजपचे गिरीष महाजन, गोवर्धन शर्मा(भाजप, अकोला), बविआचे हितेंद्र ठाकूर, भाजपचे प्रकाश भारसाखळे (भाजप, अकोट), भाजपचे मंगलप्रभात लोढा, राष्ट्रवादीचे बबनराव शिंदे यांच्या नावाचा समावेश आहे.

महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेबाबतचा महानिकाल आज सुप्रीम कोर्टाने (Supreme Court Verdict On Maharashtra Floor Test ) दिला. सर्वोच्च न्यायालयात आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी झाली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीनंतर, तात्काळ बहुमत चाचणी घेण्याची मागणी शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकासआघाडीने सुप्रीम कोर्टात (Supreme Court Verdict On Maharashtra Floor Test ) केली होती त्याबाबत रविवार आणि सोमवार अशा दोन्ही दिवस दोन्ही बाजूने युक्तीवाद झाला.  शिवसेनेतर्फे कपिल सिब्बल, काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे अभिषेक मनू सिंघवी, अजित पवार यांच्यातर्फे मणिंदर सिंग, भाजपतर्फे मुकुल रोहतगी आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात आपआपली बाजू मांडली. (SC pronounce order on Maharashtra govt formation )

Maharashtra Floor Test सुप्रीम कोर्ट LIVE

  • LIVETV – देवेंद्र फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी उद्या संध्याकाळी 5 पर्यंतची मुदत, 30 तासांचा अवधी, काऊंटडाऊन सुरु
  • उद्याच बहुमत चाचणी, फडणवीस सरकारला 27 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची मुदत
  • महाराष्ट्रातील सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रामना, अशोक भूषण आणि संजीव खन्ना सुनावणी करणार
  • काही क्षणात निकाल वाचनाला सुरुवात
  • सर्वपक्षीय वकील कोर्टात पोहोचले
  • शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण न्यायालयात पोहोचले
  • काँग्रेस नेते के सी वेणूगोपाल न्यायालयात पोहोचले

काल कोर्टात काय झालं? 

काल सकाळी दहा वाजून 35 मिनिटांनी कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात झाली. वकील तुषार मेहता यांनी कोर्टाच्या मागणीप्रमाणे आज ज्यपालांनी भाजपला सरकार स्थापनेसाठी दिलेल्या निमंत्रणाचे पत्र आणि देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेसाठी संख्याबळ असल्याचा दावा करणारे पत्र सादर केलं. त्यानंतर  ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी आक्रमकपणे भाजपची बाजू मांडली. तुषार मेहता आणि मुकूल रोहतगी यांनी राज्यपालांनी सर्व प्रक्रिया कायदेशीरपणे आणि उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी करुनच केल्याचा दावा केला. शिवाय विश्वासदर्शक ठरावाची तातडीने गरज नाही, सुप्रीम कोर्ट तसे आदेश देऊ शकत नाही, विधानसभा कामकाज हे विधीमंडळ नियमानुसार चालतं त्यामुळे कोर्ट हस्तक्षेप करु शकत नाही, असा युक्तीवाद रोहतगी यांनी केला.

यावर शिवसेना वकील कपिल सिब्बल आणि राष्ट्रवादीचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तीवाद करताना, भाजपकडे जर बहुमत आहे तर विश्वासदर्शक ठरावापासून पळ का काढत आहे, अशी विचारणा केली. तसंच तातडीने आजच्या आज विश्वासदर्शक ठराव घ्यावा, भलेही आम्ही विश्वासदर्शक ठरावात हरु, पण तो आजच घ्या अशी मागणी कोर्टाकडे केली.

संबंधित बातम्या  

आनंदाने हरु, पण विश्वासदर्शक ठराव आजच घ्या, महाविकासआघाडीची मागणी, कोर्टात उद्या निर्णय 

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.