“अजित पवारांच्या शपथविधीनंतर सुप्रिया सुळेंच्या डोळ्यातील पाणी पाहून वाईट वाटले”
"राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या डोळ्यातील अश्रू पाहूनही मलाही वाईट वाटले," असेही पंकजा मुंडे (Pankaja Munde Gopinath gad speech) म्हणाल्या.
बीड : स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीतील गोपीनाथ गडावर (Pankaja Munde Gopinath gad speech) बहुप्रतीक्षीत स्वाभिमान दिन साजरा करण्यात आला. यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर भाषण केले. “मी पक्ष सोडणार नाही, पक्षाला मला सोडायचं असेल तर माहिती नाही. आता चेंडू भजापच्या कोर्टात आहे,” असं भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde Gopinath gad speech) म्हणाल्या. “राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या डोळ्यातील अश्रू पाहूनही मलाही वाईट वाटले,” असेही पंकजा मुंडे (Pankaja Munde Gopinath gad speech) म्हणाल्या.
“राज्यात सत्तास्थापनेचे नाटक सुरु होतं. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या शपथविधीनंतर सुप्रिया सुळे यांचा चेहरा मी बघितला. त्यांच्या डोळ्यातील अश्रूही मी पाहिले. मला ते बघून हसू आले नाही. मी गोपीनाथ मुंडेंची लेक आहे. मला वाईट वाटलं. आपला 80 वर्षांचा बाप लढा दिल्यानंतर त्यांच्या पक्षात फूट पडते का? आपल घर फुटतयं की काय? ही वेदना एका मुलीच्या चेहऱ्यावरची मी भोगलेली आहे.” असे पंकजा मुंडे यावेळी (Pankaja Munde Gopinath gad speech) म्हणाल्या.
“स्वत:चा पाय तुटला म्हणजे दुसरा माणूस लंगडा व्हावा. ही आमची जात नाही. आम्ही असा विचार करत नाही. माझ्या डोळ्यातले अश्रू मी सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात पाहिले. यानंतर मी माझ्या कॉमन मित्राला म्हणाले. मला फार वाईट वाटलं.” असेही पंकजा मुंडे म्हणाल्या
यानंतर त्यांनी सुप्रिया सुळेंचे तोंडभरुन कौतुकही केले. त्यावेळी त्यांनी माझ्यासोबत माझे वडील नाहीत याची खंतही बोलून दाखवली. “सुप्रिया सुळे दुसऱ्या दिवशी यजमानीनं बाई म्हणून सर्वांचे स्वागत करत होत्या. सर्वांचे कौतुक करत होत्या. ते सर्व पाहून मलाही त्यांचे कौतुक वाटले. आज त्यांच्याबरोबर त्यांचे वडील आहे. माझ्याबरोबर नाहीत,” असेही पंकजा मुंडे यावेळी (Pankaja Munde Gopinath gad speech) म्हणाल्या.
“मी रडून मत मागत नसते. पण मुंडे साहेबांचा सत्कार तरी देवाने होऊ द्यायचा होता. सगळ्या गरीबांच्या घरात दिवा लावला होता. जेवढी असेल नसेल तेवढी रांगोळी काढली होती. बॅनर लावले होते. गुढ्या उभारल्या होत्या. का देवा अशी क्रूर थट्टा केलीस. तू जातीवादी आहेस का?” असा प्रश्नही पंकजा मुंडेंनी उपस्थित केला.
“कोणी म्हणाले की पंकजा मुंडे दबावाचं राजकारण खेळत आहेत. प्रदेशाध्यक्षपद, विधानपरिषदेचं विरोधीपक्षनेते पद मिळवण्यासाठी दबाव, पण मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. जर पदाच्या हव्यासावरुन आरोप होत असतील, तर मी कोअर कमिटीतून मुक्ती मागते,” असं पंकजा मुंडे (Pankaja Munde Gopinath gad speech) म्हणाल्या.
“आज मी कोणी नाही, माफ करा चंद्रकांतदादा, आज मी कोअर कमिटीची सदस्य सुद्धा नाही. कारण जर माझ्यावर आरोप होत असेल की मी पदासाठी दबाव आणत आहे, तर मी जाहीरपणे कोअर कमिटीच्या सदस्यपदापासून मुक्ती मागत आहे,” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.