Supriya Sule dance : सुप्रिया सुळेंनी आदिवासी बांधवांसोबत धरला ठेका! सुप्रियाताईंचं ‘तारपा नृत्य’ नक्की पाहा
औरंगाबाद दौऱ्यावर असेलल्या सुप्रिया सुळे यांचं एक वेगळं रुपही पाहायला मिळालं. औरंगाबादेतील एमजीएम विद्यापीठात एका कार्यक्रमासाठी आलेल्या सुप्रिया सुळे यांनी आदिवासी बांधवांसोबत ठेका धरला.
औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कन्या अशी एक ओळख. पण राज्य आणि देशाच्या राजकारणात स्वतंत्र अस्तित्व आणि वेगळी ओळख खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आहे. लोकसभेत त्यांची आक्रमक भाषण आपण नेहमी पाहतो. तर राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारची बाजू मांडणं असो किंवा विरोधकांवर पलटवार करणं असो, सुप्रिया सुळे नेहमीच आघाडीवर असतात. तर दुसरीकडे अनेक सार्वजनिक कार्यक्रमात त्या मोठ्या हिरिरिने सहभागी होणाऱ्या सुप्रिया सुळेही आपण पाहतो. आज औरंगाबाद दौऱ्यावर असेलल्या सुप्रिया सुळे यांचं एक वेगळं रुपही पाहायला मिळालं. औरंगाबादेतील एमजीएम विद्यापीठात एका कार्यक्रमासाठी आलेल्या सुप्रिया सुळे यांनी आदिवासी बांधवांसोबत ठेका धरला.
औरंगाबादेतील एमजीएम विद्यापीठात एका कार्यक्रमासाठी सुप्रिया सुळे आल्या होत्या. त्यावेळी आदिवासी बांधवांनी नृत्य सादर केलं. आदिवासी बांधवांचं नृत्य पाहून सुप्रियाताईंनाही मोह आवरला नाही. मग त्यांनीही आदिवासी बांधवांसोबत तारपा नृत्य केलं. सुप्रिया सुळे आपल्यासोबत नृत्य करत असल्यानं आदिवासी बांधवांचाही उत्साह द्विगुणित झाला. उपस्थितांनीही सुप्रियाताईंच्या नृत्यावर टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन दिलं.
राऊतांच्या मुलीच्या लग्नातही ‘लंबोर्गिनी चलाई जाने ओ…’
शिवसेना खासदार संजय राऊत यांची लेक पूर्वशीच्या लग्नातही सुप्रिया सुळे यांनी भन्नाट डान्स केला होता. राऊत यांच्या लेकीच्या लग्नासाठी सर्वच क्षेत्रातील बड्या लोकांनी हजेरी लावली होती. त्यात शरद पवारांसह सुप्रिया सुळे आणि त्यांचं कुटुंबही सहभागी झालं होतं. त्यावेळी आयोजित संगीत कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी संजय राऊत यांना सोबत घेत ‘लंबोर्गिनी चलाई जाने ओ…’ या गाण्यावर नृत्य केलं होतं. सुप्रियाताई आणि संजय राऊतांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
लेकीच्या लग्नाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात संजय राऊतांचा सुप्रिया सुळेंसोबत डान्स #SanjayRaut #Ncp #Shivsena pic.twitter.com/h01bKqDPQl
— Salman Shaikh Gangapur Kar (@MiSalmanShaikh) November 28, 2021
इतर बातम्या :