सुप्रिया सुळे कुणाल कामराच्या भेटीला, ‘शट अप या कुणाल’मध्ये मुलाखत रंगणार?

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही 'शट अप या कुणाल'मध्ये हजेरी लावणार का, याची उत्सुकता लागली आहे.

सुप्रिया सुळे कुणाल कामराच्या भेटीला, 'शट अप या कुणाल'मध्ये मुलाखत रंगणार?
File image of Supriya Sule Kunal Kamara
Follow us
| Updated on: Oct 13, 2020 | 3:28 PM

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही ‘शट अप या कुणाल’मध्ये हजेरी लावणार का, याची उत्सुकता लागली आहे. सुप्रिया सुळेंनी स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरासोबतच्या भेटीचा फोटो ट्वीट केल्याने चर्चांना उधाण आले आहे. (Supriya Sule meets Kunal Kamra might give interview for Shut Up Ya Kunal)

कुणाल कामराने संजय राऊत यांना ‘शटअप या कुणाल’ शोच्या दुसऱ्या सिझनचे पहिले पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. ‘शटअप या कुणाल’ शोसाठी कुणालने रविवारी (11 ऑक्टोबर) संजय राऊत यांच्यासोबत मुलाखतीचे चित्रिकरण केले. राज्य ते देशाच्या राजकारणातील घडामोडी, मोदी सरकार ते महाविकास आघाडी सरकार, सुशांतसिंह प्रकरण ते कंगनाशी झालेला वाद, राज्यातील कोरोनाची स्थिती, कन्हैया कुमार ते मनसे या मुद्द्यांवर मुलाखत रंगली. खार येथील ‘द हॅबिटेट स्टुडिओ’त दीड तासांची ही मुलाखत झाली.

‘संजय राऊत सरांनी ‘शटअप या कुणाल’ या पॉडकास्टच्या दुसऱ्या पर्वाचे पहिले पाहुणे म्हणून सहभागी होण्याची तयारी दर्शवली, तरच मी पुन्हा कार्यक्रम सुरु करेन, अन्यथा कुणालाही संधी नाही’, असे ट्वीट कुणाल कामराने केले होते. कुणालचे निमंत्रण स्वीकारत संजय राऊत यांनी मुलाखत देण्याचे कबूल केले. मुलाखतीची पूर्वतयारी म्हणून आधी हॉटेल ग्रँड हयातमध्ये दोघांची ‘मुलाकात’ झाली. त्यावेळी जवळपास दीड तास दोघांची चर्चा रंगली होती.

कुणाल कामरा नेटीझन्समध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. कुणाल स्टॅण्ड अप कॉमेडीसोबतच ‘शट अप या कुणाल’ या कार्यक्रमात मोठमोठ्या सामाजिक तसेच राजकीय व्यक्तींच्या मुलाखती घेतो. कुणालने यूट्यूबवर 2017 मध्ये हा शो सुरु केला होता. भाजप यूथ विंगचे उपाध्यक्ष मधुकिश्वर देसाई यांच्या मुलाखतीने ‘शट अप या कुणाल’च्या पहिल्या सिझनला सुरुवात झाली होती.

कुणालने आतापर्यंत शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी (तत्कालीन काँग्रेस प्रवक्त्या), जेएनयू विद्यार्थी नेते कन्हैया कुमार आणि उमर खलिद, एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी, गीतकार जावेद अख्तर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार, काँग्रेस नेते मिलिंद देवरा, खासदार तेजस्वी सुर्या यांच्या मुलाखती घेतल्या आहेत.

संबंधित बातम्या :

Shut Up Ya Kunal | कुणाल कामराची साद, संजय राऊतांचा प्रतिसाद, कुणालचं निमंत्रण स्वीकारलं   

Shut Up Ya Kunal | संजय राऊतांनी ‘शट अप’चे ओपनिंग केले तरच दुसरा सिझन; कुणाल कामराचे निमंत्रण   

कुणाल कामराकडून राज ठाकरेंना वडापाव ऑफर, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विनंती 

मुलाखतीआधी ‘मुलाकात’, संजय राऊत-कुणाल कामराची दीड तास चर्चा

(Supriya Sule meets Kunal Kamra might give interview for Shut Up Ya Kunal)

दलित अत्याचाराविरुद्ध कधीही आवाज न उठवणाऱ्या संजय राऊत यांनी आम्हाला शिकवू नये : रामदास आठवले

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.