महाराष्ट्राची कन्या म्हणून न्याय मागतेय, तुम्ही राज्याराज्यांत का द्वेष पसरवत आहात? पंतप्रधानांना उद्देशून काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोरोनाविषयक वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'राज्याबद्दल जे बोलले ते दुःख देणारी गोष्ट होती. मला प्रचंड वेदना झाल्या. आपल्या महाराष्ट्राबद्दल मोदी असं का बोलत आहेत?
नवी दिल्ली: देशात कोरोना पसरवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार आहे, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल केलं. त्यावर सर्वच स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रावर कोरोना ( Corona Spreader) पसरवल्याचे पंतप्रधानांचे आरोप हे अशास्त्रीय असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच असे वक्तव्य करून तुम्ही राज्या-राज्यांत द्वेष पसरवत आहात, असेही त्या म्हणाल्या. एक महाराष्ट्राची कन्या म्हणून मी तुमच्याकडे न्याय मागतेय, तुम्ही महाराष्ट्रावर असे आरोप का केले, असा सवाल विचारतेय, अशी खेदजनक प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोरोनाविषयक वक्तव्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘ आम्ही सुपर सप्रेड आहोत असं कसं बोललात? तुम्ही थोडाही शास्त्रीय आरोप केला असता तरी मी कबूल केला असता. मी केवळ टीका करायची म्हणून टीका करत नाही. मी महाराष्ट्राची कन्या म्हणून त्यांच्याकडे न्याय मागते आहे. तुम्ही का म्हणून असा आरोप केला? का तुम्ही राज्या-राज्यात द्वेष पसरवत आहात? ही एक प्रांजळ महिला पंतप्रधानांकडे न्याय मागते. पंजाब ही संताची भूमी आहे. त्यांचं आपलं नातं जवळचं आहे. उत्तर प्रदेशाची आपलं नातं आहे. चंद्रशेखर यांचं महाराष्ट्रावर विशेष प्रेम होतं. ते पंतप्रधान होऊन गेलं. त्यांच्याशी आपले घनिष्ट संबंध. यूपी-बिहारचे लोक आपल्याकडे येतात. पण आपल्यात आणि त्यांच्यात अंतर आणण्याचं काम पंतप्रधानांच्या भाषणातून होऊ शकतं हे मला धक्कादायक आणि दुर्देवी आहे, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी त्यांची खंत बोलून दाखवली.
मोदींच्या वक्तव्याने वेदना- सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या, ‘राज्याबद्दल जे बोलले ते दुःख देणारी गोष्ट होती. मला प्रचंड वेदना झाल्या. आपल्या महाराष्ट्राबद्दल मोदी असं का बोलत आहेत? 18 खासदार भाजपला राज्याने दिला. मोदी पंतप्रधान आहेत त्यात महाराष्ट्रातील मतदारांचा मोठा वाटा आहेत. त्यांनी मतदारांचा अपमान केला. कोविड स्प्रेडर म्हणून अपमान केला. ते केवळ भाजपचे पंतप्रधान नाही ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी असं विधान केलं. त्यामुळे दुःख झालं. पंतप्रधानांची पोस्ट ही पक्षाची पोस्ट नाही. ती संविधानिक पोस्ट आहे. ते देशाचे आहे. त्यामुळे त्यांचं विधान दुखदायक होतं.’
पंतप्रधानांचं वक्तव्य काय होतं?
कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात देशभरात कोरोना पसरवण्याचं काम महाराष्ट्रातील काँग्रेसने केले. काँग्रेसने युपी आणि बिहारींनी मुंबईतून बाहेर जाण्यासाठी उकसवलं. लॉकडाऊनमध्ये मजुरांना रेल्वेची मोफत तिकिटे काढून दिली. राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते स्टेशनबाहेर उभे राहून स्थलांतरीत मजुरांना राज्याबाहेर पाठवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगून काँग्रेसनेच देशभरात कोरोना पसरवल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता.
इतर बातम्या