“राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज”, सुप्रिया सुळेंचं विधान

राज्यात विविध मुद्दे गाजत असताना सुप्रिया सुळे यांचं एक विधान सध्या चर्चेत आलं आहे. राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज, सुप्रिया सुळेंचं विधान
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 4:48 PM

मुंबई : राज्यात विविध मुद्दे गाजत असताना  सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचं एक विधान सध्या चर्चेत आलं आहे. राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. सध्या सणवार सुरु आहे. मुख्यमंत्री सध्या दौरा करत आहेत. महाराष्ट्राला (Maharashtra) सध्या दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे. एक जे कार्यक्रमाला जातील आणि दुसरे जे मंत्रालयात बसून काम करतील. असा मेसेज आपल्याला आल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. पाहा सुप्रिया सुळे काय म्हणाल्या…

बारामतीच्या संदर्भात म्हटलं तर मी संविधानावरती विश्वास ठेवते. त्यावेळेस मला जेपी नड्डा यांचे वाक्य आठवतं की या देशांमध्ये एकच पार्टी राहिली पाहिजे. पण मी संविधानाप्रमाणे अनेक पार्टी राहावी या मताची आहे.बारामतीमध्ये कोणीही यावं त्यांचं स्वागत आहे. अशा पद्धतीने बारामती जरी असली तरी सुद्धा लोकांचा कौल आहे. तो कोणाला निर्णय द्यायचा कुठलाही भाजपचा नेता बारामतीमध्ये येत असेल तर त्याचं स्वागतच आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

सेंट्रल विस्टा असेल किंवा इतर वेगवेगळ्या मार्गांना नवीन नाव द्यायचा मुद्दा असेल. माझ्यासमोर सध्या बेरोजगारी, महागाई हे जनतेच्या संबंधित प्रश्न महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारने त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. इतर प्रकल्प राबवण्यापेक्षा महागाई आणि बेरोजगारी कशी कमी होईल यासाठी चर्चा होणं अपेक्षित आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

मी स्वतः अनेक मंत्र्यांना माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या कामांसाठी वेळ मागितली. पण ते वेळ देत नाहीये. याचा अर्थ प्रशासन गेल्या अडीच महिन्यापासून ठप्प आहे. हे सरकार ज्या पद्धतीने सांगितलं जाते ओरबडून आणि चुकीच्या पद्धतीने आलेला आहे. त्याचा परिणाम प्रशासनावर होताना दिसत आहे.प्रशासना बरोबर काम करणाऱ्या मंत्र्यांची राज्याला गरज आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.