Sanjay Rathod : संजय राठोडांवरुन चित्रा वाघ स्वपक्षावर बरसल्या, सुप्रिया सुळे म्हणतात, “त्यांना मंत्रिपद मिळाल्याचा मनापासून आनंद”

शिंदे गटातील आमदार संजय राठोडांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलंय. त्यांनी आज मंत्रिपदाच्या गोपनियतेची शपथ घेतली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी संजय राठोड यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

Sanjay Rathod : संजय राठोडांवरुन चित्रा वाघ स्वपक्षावर बरसल्या, सुप्रिया सुळे म्हणतात, त्यांना मंत्रिपद मिळाल्याचा मनापासून आनंद
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 2:39 PM

मुंबई : संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यावरून सध्या राजकारण तापलंय. पूजा चव्हाण (Pooja Chavan) मृत्यूप्रकरणी त्यांच्यावर टीका होतेय. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी तर आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. पण राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मात्र संजय राठोड यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. संजय राठोड महाविकास आघाडीमध्ये मंत्री होते. तेव्हा त्यांच्यावर आरोप केले जात होते तेव्हापासून आमचं एकच म्हणणं आहे की ते निर्दोष आहेत. त्यांच्यावर केले जाणारे आरोप योग्य नाहीत. तेव्हा त्यांना मंत्रिपद सोडावं लागलं होतं. आता भलेही ते आमच्यासोबत नसतील. पण शिंदे सरकारमध्ये ते मंत्री झालेत याचा मला मनोमन आनंद आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

आज मंत्रिमंडळ विस्तार झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला नेत्याला स्थान देण्यात आलेलं नाही. त्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही टीका करत थेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला आहे. “स्वतः पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ ‘होम मेकर’ असू नयेत तर त्या ‘नेशन बिल्डर’ असाव्यात असं ते सांगतात. पण राज्यात मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली परंतू यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही. मंत्रीमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजपनेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. पण आता त्याचं पुन्हा एकदा त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यावरून भापच्या नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत राठोडांना मंत्रिपद देणं योग्य नसल्याचं म्हटलंय. “पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं, हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास लडेंगे….जितेंगे”, असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.