Supriya Sule : सुप्रिया सुळे यांना दुखापत, पाहा याविषयी काय म्हणतायत सुप्रिया सुळे

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांना दुखापत, पाहा याविषयी काय म्हणतायत सुप्रिया सुळे

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांना दुखापत, पाहा याविषयी काय म्हणतायत सुप्रिया सुळे
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 5:22 PM

मुंबई : काही वेळापुर्वी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दुखापत झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर (Social Media) केली आहे. नेमकी कशामुळे दुखापत झाली हे अद्याप त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. परंतु त्यांनी माझी दुखापत अत्यंत किरकोळ असून काळजी करण्याचं काहीचं कारण नाही असं जाहीर केलं आहे. त्याचबरोबर दरम्यानच्या काळात माझी विचारपूस करणाऱ्या सगळ्यांचे मनापासून आभार असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नेमकी कशामुळे दुखापत झाली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तसेच सुप्रिया सुळे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून ही पोस्ट (Facebook Page Post) कऱण्यात आली आहे त्यामुळे तिथं देखील त्यांचे कार्यकर्ते काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत.

हे सुद्धा वाचा

काळजी न करण्याचे आवाहन

आज सुप्रिया सुळे यांच्या फेसबुक पेजवरून अचानक त्यांना दुखापत झाल्याची पोस्ट शेअर करण्यात आली. त्यामुळे राज्यभरातील त्यांचे कार्यकर्ते एकदम अचंबित झाले आहेत. त्यांनी माझी तब्येत बरी असल्याचं फेसबुकच्या पोस्टमधून सांगितलं आहे. तसेच कोणीही काळजी करण्याचं कारण नाही. दरम्यानच्या काळात ज्यांनी फोन करुन माझी चौकशी केली त्यांचे आभार अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. त्या राष्ट्रवादीच्या खासदार आहेत. त्यामुळे त्या त्यांच्या बारामती मतदार संघात कायम पाहायला मिळतात.  बारामती मतदार संघात त्यांनी त्यांची मतदारांवरती पकड कायम ठेवली आहे.

डॉक्टरांचे मानले आभार

सुप्रिया सुळे यांना दुखापत नेमकी कशामुळे झाली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. परंतु सुप्रिया सुळे यांनी काही डॉक्टरांसोबत एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांच्यासोबत काही डॉक्टर आहेत. तसेच सुप्रिया सुळे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. यापुढे त्या आराम करतात की, त्यांचा नियोजित दौरा पुढे कायम करतात याबाबत सुद्धा अधिक माहिती मिळालेली नाही. पण काही दिवस त्या आराम करण्याची शक्यता आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.