माझ्या बापाचा नाद करायचा नाही, सुप्रिया सुळे अजित पवारांवर कडाडल्या

घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना सांगायचं की तुम्ही घरी बसून आशीर्वाद द्या, असं म्हणणाऱ्या मुलांपेक्षा मुली बऱ्या अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

माझ्या बापाचा नाद करायचा नाही, सुप्रिया सुळे अजित पवारांवर कडाडल्या
सुप्रिया सुळेंचा इशारा
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 6:36 PM

मुंबई : एक सांगते, बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही. बाकी कुणाबद्दलही बोला, आमच्यावर टीका करायची असेल तर कर, पण बापाचा नाद करायचा नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) दिला आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) वयाबद्दल बोलत अजित पवारांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी हे प्रत्युत्तर दिले. वय झाल्याने वडीलधाऱ्या मंडळीना थांबायला सांगणाऱ्या पोरांपेक्षा, आम्ही पोरी बऱ्या, अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांना सुनावले.

वांद्रे येथील झालेल्या बैठकीत अजित पवार गटाने शक्तीप्रदर्शन केले. त्यावेळी अजित पवारांनी अनेक गौप्यस्फोट करत शरद पवारांवरही टीकास्त्र सोडले. वय जास्त झालं. 82 झालं , 83 झालं, तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? तुम्ही आशीर्वाद द्या. तुम्ही शतायुषी व्हा, असे अजित पवार म्हणाले होते. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना खडे बोल सुनावले.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

एक सांगते मी महिला आहे. छोटसं काही बोललं तरी टचकन डोळ्यात पाणी येतं . पण जेव्हा संघर्षांची वेळ येते तेव्हा पदर खोचून तीच (महिला) अहिल्या होतो, तीच ताराराणी होते आणि तीच जिजाऊ होते. ही लढाई एका व्यक्ती विरोधात नाही , तर भारतीय जनता पक्षाच्या प्रवृत्तीविरोधात आपला लढा आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अशा पोरांपेक्षा आम्ही पोरीच बऱ्या

काही वर्षांपूर्वी माझं मन हळवं होतं, पण आता गेल्या चार-पाच वर्षांत ते घट्ट झालंय. ज्यांच्यामुळे हे झालं त्यांना धन्यवाद, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. शरद पवारांच्या वयाबद्दल बोलत त्यांना निवृत्त होण्यास सांगणाऱ्या अजित पवारांवर सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला. काही लोक, आता वय झाल्याने जेष्ठ नेत्यांनी केवळ आशिर्वाद द्यावेत असा सूर आवळत आहे. पण वय हा फक्त आकडा आहे, जिद्द पाहिजे.

रतन टाटा या वयातही काम करतात. वयाची 80 वर्ष उलटल्यानंतरही अमिताभ बच्चन हे जाहिरातीत आणि मोठ्या पडद्यावर दिसतात ना, याचा दाखला सुप्रिया सुळे यांनी दिला. आपल्या वडिलांना म्हणायचं की, तुम्ही घरी बसा आणि आशीर्वाद द्या ,असं म्हणणाऱ्या पोरांपेक्षा मुलीच चांगल्या, अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांना सुनावलं. घरावर संकट आले, अडचण आली की मुलीच धावून येतात, असे सूचक वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.