मोठे नेते, मोठे कुटुंब, सुप्रिया सुळेंनी ट्विट केलेला फोटो पाहिला का?

कुटुंबासोबतचा एक फोटो राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केला आहे.

मोठे नेते, मोठे कुटुंब, सुप्रिया सुळेंनी ट्विट केलेला फोटो पाहिला का?
Follow us
| Updated on: Dec 22, 2020 | 8:34 AM

मुंबई :   ‘पवार‘ हे देशाच्या राजकारणातील मोठं नाव…. त्यांच्याशिवाय राजकारणाचा पट लिहिला जाऊ शकत नाही. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार आणि आता रोहित पवार… राजकारणात जसं पवारांचं मोठं नाव आहे अगदी त्याच पद्धतीने त्यांचं कुटुंब देखील मोठं आहे. एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार कुटुंब एकत्र येतं. असाच एक फोटो राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केला आहे. (Supriya Sule Tweet Familly photo)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच वयाची 80 वर्ष पूर्ण केली. विविध उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस साजरा झाला. पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीने मुंबईत एका खास कार्यक्रमाचं आयोजन केलं. अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. पण शेवटी कुटुंबाशिवाय सगळं अधुरं आहे. संध्याकाळी पवारसाहेबांच्या वाढदिवसाला सगळं कुटुंब एकत्र जमा झालं. कुटुंबप्रमुखाचा वाढदिवस असल्याने सगळेजण आनंदी होते. शुभेच्छांचा फॉर्मल कार्यक्रम पार पडल्यानंतर मग काय, ‘फोटो तो बनता हैं…!’

आपल्या माणसांनी दिलेले आशीर्वाद मनात जपा आणि आपल्याला जे मिळालंय, तुम्ही ज्या माणसांना ओळखता, तुम्ही माणूस म्हणून जसे घडले आहात, त्याबद्दल कृतज्ञता बाळगा, अशा खास भावना व्यक्त करत सुप्रिया सुळे यांनी पवारांच्या वाढदिवसाचा फॅमिली फोटो ट्विट केला आहे. या फोटोत 70 हून अधिक लोकं आहेत.

स्वत: शरद पवार, प्रतिभा पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार, राजेंद्र पवार, सुनंदा पवार, खासदार सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, श्रीनिवास पवार, पार्थ पवार, आमदार रोहित पवार, जय पवार, शर्मिला पवार, रणजीत पवार, युेगंद्र पवार तसेच आणखीही बरेच सदस्य या फोटोमध्ये दिसत आहेत.

संबंधित बातम्या

दोन बर्थडे आणि एक अ‌ॅनिव्हर्सरी, पवार-ठाकरे कुटुंबाचं ‘तिहेरी सेलिब्रेशन’

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.