सुप्रिया सुळे यांना वर्ध्यातून लोकसभा लढवायची?, सर्वात मोठं विधान; काय म्हणाल्या नेमक्या?

माझा तंत्रज्ञानावर प्रचंड विश्वास आहे. मात्र शिक्षकावर त्याहून अधिक विश्वास आहे. मी चॅटजीपीटीवरुन माझी माहिती काढली तर त्यांनी पुण्यातून माझं ग्रॅज्युएशन दाखवलं. मात्र माझं ग्रॅज्युएशन मुंबई विद्यापीठातून झालं आहे. लागलं तर मी हावर्ड देखील लावून घेईल. मात्र ते खरं नाही ना? सध्या टिपटॉप राहण्याचा बागुलबुवा झालेला आहे. अंगाला माती लागू द्या ना. सर्फचा जमाना आहे. लागू द्या चिखल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांना वर्ध्यातून लोकसभा लढवायची?, सर्वात मोठं विधान; काय म्हणाल्या नेमक्या?
Supriya Sule Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Nov 26, 2023 | 5:53 PM

अविनाश माने, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 26 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मनातील एक इच्छा बोलून दाखवली आहे. त्यांनी वर्ध्यातून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. कधी तरी संधी मिळाली तर मला वर्ध्यातून लढायला आवडेल. पक्षालाही मी हे अनेकदा सांगितलं. माझं वर्ध्याशी भावनिक नातं आहे. माझी कर्मभूमी बारामतीच असणार आहे. पण वर्ध्याच्या मातीशी माझं काय नातं आहे माहीत नाही. शब्दात सांगता येत नाही. माझ्या मनात आहे. वर्षातून दोन वेळा माझा गाडी वर्ध्याला जातेच, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

एका कार्यक्रमात बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मनातील ही इच्छा व्यक्त केली आहे. आज दोन महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. एक आनंद देणारी आणि दुसरी खूप दु:ख देणारी. एकीकडे संविधान आणि दुसरीकडे 26/11 चा हल्ला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला खूप काही दिलं. आपण अनेक वेळा बाबासाहेबांना छोट्या चौकटीत अडकवतो असा माझा आरोप आहे. बाहेर जगात गेल्यावर आंबेडकर आणि गांधी यांच्याबद्दल विचारलं जातं. आपण आपल्या कृतीतून त्यांच्या विचाराचा प्रसार केला पाहिजे असा माझा आग्रह राहील, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आपली मोठी परीक्षा

मुंबईकर आम्ही तुमच्या समोर उभे आहोत याचं कारण आपल्या पोलिस यंत्रणेने जो त्याग केला त्यासाठी मी त्यांचे आभार मानते. मात्र यातून सुवर्णमध्य काढत आपल्याला पुढे जायचं आहे. आपण दरवर्षी कॉन्फरन्स घेतोच. मात्र पुढच्या वर्षी सात विभागात सात कार्यक्रम घ्यावे असं मी सूचवते, अशी सूचना त्यांनी केली. आपली मोठी परीक्षा आहे, ती मे पर्यंत संपेल. माय बाप जनता ठरवेल पुन्हा आम्हाला निवडून द्यायचं की नाही , असंही त्यांनी सांगितलं.

अदृश्य शक्तींवर विश्वास

आमच्याकडे घड्याळ चिन्ह अजूनही आहे. त्यामुळे घड्याळाचं उदाहरण देते. माझा अदृश्य शक्तींवर विश्वास आहे, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी भाजपला लगावला. माझी श्रद्धा आहे अंधश्रद्धा नाही, माझा सायन्सवर विश्वास आहे. शेवटी लॉजिकने देश चालतो. आम्ही करू ते असं होत नाही. 2024मध्ये सर्व ठिक होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.