पंकजा मुंडे यांना देखील भाजपने…. सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे नाव घेत भाजपवर गंभीर आरोप केला आहे.
परभणी : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या त्यांच्या आक्रमक भाषण शैलीमुळे चांगल्याच चर्चेत आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे नाव घेत भाजपवर गंभीर आरोप केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही. पंकजा मुंडे यांना देखील भाजपने मागे टाकले आहे असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
भाजपच्या डोक्यात मनुवादी विचार आहेत. यामुळेच भाजपच्या मंत्रिमंडळात एकही महिलेचा समावेश नाही असं वक्तव्य शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे.
परभणी येथे उद्धव ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील यांनी आयोजित केलेल्या महिलांच्या कार्यक्रमात अंधारे बोलत होत्या. यावेळी त्यांनी भाजप पक्षावर सडकून टीका केली आहे.
जिच्या हातात पाळण्याची दोरी, ती जगाचा उद्धार करी. पण भाजपचे विचार वेगळे आहेत. पंकजा मुंडे सारख्या कर्तुत्वान महिलेला जेव्हा भाजप मागे टाकते, तेव्हा लक्षात येते की भाजपचा विचार महिलेला मागे टाकणारा आहे. कारण मनुवादी विचार त्यांच्या डोक्यात आहे अस सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या.