तर यांचा अभ्यास कमी पडतो; सुषमा अंधारे यांचा भाजपच्या या नेत्यावर हल्लाबोल
आजही ठाकरे यांच्यासोबत आहे. हे प्रेम कुठल्याही ठेकेदारीत, टोकनाक्याच्या वसुलीत मोजता येणार नाही, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.
छत्रपती संभाजीनगर : येथे महाविकास आघाडीची सभा होत आहे. या सभेला महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनीही हजेरी लावली. सभास्थळी जात असताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, शिवसेनेतून किती आमदार गेले याने आम्हाला काही फरक पडत नाही. कारण शिवसैनिकांमुळे आमदार आहेत. आमदारांमुळे शिवसेनिक नाही. तळागळातला शिवसैनिक आमच्या सोबत आहे तोपर्यंत आम्हाला काळजी करण्याची गरज नाही. शेख मुसा नावाचा शिवसैनिक आहे. तो म्हणाला, मी नवव्या वर्गापासून बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आजही ठाकरे यांच्यासोबत आहे. हे प्रेम कुठल्याची ठेकेदारीत, टोकनाक्याच्या वसुलीत मोजता येणार नाही, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. आजच्या सभेनंतर जी काही जमली असेल ती हटून पुन्हा निखारा पेटेल, असा विश्वास अंधारे यांनी व्यक्त केला.
नांदणारीला पळ म्हणायचं नि पळणारीला नांद म्हणायचं. अशी एक म्हण आहे. आम्ही किती सभा घेऊ शकतो हे खेडच्या सभेत दाखवलं. आमची काय कुवत आहे ते आम्ही मालेगावला दाखवलंय. त्यामुळे आमच्या ताकदीविषयी कुणी सांगायची गरज नाही, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.
मंत्रीपदाची शपथ घेताना माझ्या निदर्शनात आणून दिलेली बाब कुठलाही पूर्वग्रह न बाळगता मी ते काम पार पाडेन. परंतु, गृहखात तसं करताना दिसत नाही. गृहखात सरकारी खात्यातल्या सगळ्या कारवाया फटाफट नोंदवून घ्यायला तयार आहे. गणेश बिडकरची कारवाई लगेच नोंदवून घेतली जाते.
तरीही फडणवीस मूग गिळून गप्प असतात
सुषमा अंधारे पब्लिक डोमेनमधील पुरावे देते तरी तक्रार दाखल करून घेतली जात नाही. बार्शीचे पीडित सांगत होते की, संजय राऊत आम्हाला न्याय देत आहेत. तरीही चित्रा वाघ या राऊत यांच्यावर आक्रस्ताळेपणा करत होत्या. गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस मात्र मूग गिळून गप्प असतात, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
त्यांना अजून विदर्भाचा पोत कळला नाही
अनिल बोंडे यांनी संभाजीनगरच्या दंगलीला राष्ट्रवादी जबाबदार असल्याचं म्हटलं. यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, अनिल बोंडे यांनी आधी त्यांच्या मतदारसंघातील वाळू तस्करीला जबाबदार आहेत. त्याची आधी उत्तरं द्यावी. अनिल बोंडे हे एका मतदारसंघातपुरते मर्यादित आहेत. त्यामुळे मराठवाड्याचा पोत कळेना त्यांना मुश्किल आहे. त्यांना अजून विदर्भाचा पोत कळला नाही.
याचा अर्थ फडणवीस यांना काही गोष्टी कळत नाही
सुषमा अंधारे यांनी सांगितलं की, संभाजीनगर येथील दंगलीला भाजप जबाबदार आहे. स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी अशा दंगली घडवल्या जातात. हे धंदे भाजपने बंद करावे, असा घणाघात सुषमा अंधारे यांनी केला. हे भाजप मान्य करत नसतील तर देवेंद्र फडणवीस यांना काही गोष्टी कळत नाहीत. फडणवीस यांचा अभ्यास कमी पडतो. पकड कमी पडते. सहा सहा खाती एका व्यक्तीकडे कशाला हवेत, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.