अरे बघ ही गर्दी, पाक धुरळा आहे…; सुषमा अंधारे यांनी कोणत्या केंद्रीय मंत्र्याला टोला लगावला?

मला दुसऱ्या पक्षातून आलेलं पार्सल म्हणता मग तुमच्याकडे आलेले कोण आहेत? तुमच्याकडे 50% राष्ट्रवादीचे, 25% काँग्रेसची आणि 15 टक्के आमचे भाऊ तुमच्याकडे आले आहेत.

अरे बघ ही गर्दी, पाक धुरळा आहे...; सुषमा अंधारे यांनी कोणत्या केंद्रीय मंत्र्याला टोला लगावला?
अरे बघ ही गर्दी, पाक धुरळा आहे...; सुषमा अंधारे यांनी कोणत्या केंद्रीय मंत्र्याला टोला लगावला? Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 17, 2022 | 10:57 AM

कोल्हापूर: ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. नारायण राणे यांनी शिवसेना संपली असल्याचं म्हटलं होतं. शिवसेना संपली आहे. शिवसेनेत आहेत ते आमदारही आमच्याकडे येणार आहेत, असा दावा राणे यांनी केला होता. राणे यांच्या या दाव्याला सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अरे माझ्या सभेची ही गर्दी बघ.. पाक धुरळा उडाला आहे, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी राणेंवर हल्लाबोल केला आहे.

सुषमा अंधारे यांची कोल्हापुरात सभा होती. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. भाजपाकडून द्वेषमूलक राजकारणाची पेरणी केली जात आहे. भाजपच्या आयटी सेलमधून धर्म आणि जातीचं विष पेरलं जात आहे. लोकालोकांमध्ये भेद निर्माण जात आहे. हे उद्याच्या राजकारणासाठी घातक आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

शिंदे गटातील 40 मधील 20 आमदार हे उड्या मारण्यात माहीर आहेत. यातील अनेकांना उद्या भाजपमध्ये जाण्याशिवाय गत्यंतर नाही. तुम्ही आम्हाला ना ईडी लावू शकत, ना सीडी काढू शकता. फार फार तर वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करू शकता. गेल्या दोन दिवसांपासून तर ती सुरूच आहे, असं त्या म्हणाल्या.

दोन कोटी लोकांना रोजगार देऊ म्हणाला होतात, मिळाला का रोजगार? जी आश्वासनं तुम्ही दिली होती त्याबद्दल आम्ही विचारतोय. वेगळं काही करत नाही, असा टोला त्यांनी लगावला. सुषमा अंधारे किती महिन्यांपूर्वी शिवसेनेत आल्या हे महत्त्वाचं नाही. सुषमा अंधारे जे प्रश्न उपस्थित करत आहेत, त्याची उत्तरे द्या. ते प्रश्न महत्त्वाचे आहेत. आहेत का तुमच्याकडे उत्तर? असा सवालच त्यांनी केला.

मला दुसऱ्या पक्षातून आलेलं पार्सल म्हणता मग तुमच्याकडे आलेले कोण आहेत? तुमच्याकडे 50% राष्ट्रवादीचे, 25% काँग्रेसची आणि 15 टक्के आमचे भाऊ तुमच्याकडे आले आहेत. तुमचा भाजपवाल्यांचा आकडा आहे तरी किती? भाजपची अवस्था कशी झालीय माहीत आहे का? आपली लेकरं रस्त्यावर फिरतात आणि दुसऱ्याच्या लेकरांना येतोस का विचारत आहेत, अशी यांची अवस्था झाली आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

आम्ही हिंदू आहोत हे तुम्हाला ओरडून सांगायची का गरज पडते? जे ओरिजनल असतं त्याला असं ओढून सांगायची गरज लागत नाही. दिलेली आश्वासन भाजपला पूर्ण करता येत नाहीत म्हणून विषय डायव्हर्ट करण्यासाठी चर्चा धर्मावर आणली जाते, असा दावाही त्यांनी केला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.