देवेंद्रभाऊंवर वर्कलोड अधिक झालाय, त्यांना गृहमंत्रीपद झेपत नाहीये; सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?

संजय राऊत यांच्या येण्यामुळे शिवसेनेची ऊर्जा आणि ताकद वाढली आहे. उमेद वाढली आहे. ही अटकच बेकायदेशीर होती हे कोर्टाने निरीक्षण नोंदवलं आहे.

देवेंद्रभाऊंवर वर्कलोड अधिक झालाय, त्यांना गृहमंत्रीपद झेपत नाहीये; सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?
देवेंद्रभाऊंवर वर्कलोड अधिक झालाय, त्यांना गृहमंत्रीपद झेपत नाहीये; सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 11, 2022 | 2:04 PM

मुंबई: राज्यातील शिंदे गटाच्या नेत्यांकडून महिलांबद्दल केल्या जात असलेल्या बेताल वक्तव्यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. महिलांबद्दल खुद्द मंत्रीच अपशब्द वापरत असतानाही फडणवीस गुळमुळीत प्रतिक्रिया देत आहेत. याचाच अर्थ त्यांच्यावर वर्कलोड आहे. त्यांना गृहमंत्रीपद झेपत नाही. त्यांनी आपलं पद दुसऱ्यांकडे सोपवावं, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. तसेच राज्यात गृहमंत्रालय नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का? असा सवालही सुषमा अंधारे यांनी केला आहे.

सुषमा अंधारे यांनी आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधला. कुठे काळं फासलं असेल, महिलांवर अत्याचार होत असतील आणि महिलांवर गरळ ओकली जात असेल या सर्वांवर मी फक्त फडणवीस यांनाच प्रश्न विचारते. गृहमंत्रालय नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.

हे सुद्धा वाचा

फडणवीस यांच्यावर वर्कलोड खूप आहे. मला त्यांची काळजी वाटते. मी त्यांची बहीण आहे. त्यांनी थोडा वर्कलोड कमी केला पाहिजे. गृहमंत्रीपद त्यांना झेपत नाही. त्यामुळे त्यांनी ते कुणाला तरी दिलं पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.

संसद रत्न पाच वेळा मिळालेल्या महिलेबद्दल कृषी मंत्र्यांनी अपशब्द वापरले. संभाजी भिडे महिला पत्रकाराला बोलले. गुलाबराव पाटीलही माझ्याबद्दल बोलले. त्यावर असं बोलू नये, असं इतक्या गुळगुळी भाषेत गृहमंत्री मखलाशी करत असतील तर त्याचा अर्थ समजून घ्या, असंही त्या म्हणाल्या.

संजय राऊत यांच्या येण्यामुळे शिवसेनेची ऊर्जा आणि ताकद वाढली आहे. उमेद वाढली आहे. ही अटकच बेकायदेशीर होती हे कोर्टाने निरीक्षण नोंदवलं आहे. ईडीने ज्या ज्या कारवाया केल्या त्यातून आरोप सिद्ध होण्याचा रेट खूप कमी आहे. मग ईडी कशासाठी आहे? असा सवाल त्यांनी केला.

केवळ राजकीय सूडबुद्धीने कारवाया करण्यासाठी ईडी आहे का? मग ईडीची खरंच गरज आहे का? यावर चर्चा, संशोधन झालं पाहिजे. सभागृहातून प्रश्न विचारला गेला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.