लाडक्या नेत्याला वाचवण्यात अपयश, AIIMS चे डॉक्टर ढसाढसा रडले!
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा झेंडा अभिमानाने फडकवणाऱ्या देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचं निधन झालं.
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा झेंडा अभिमानाने फडकवणाऱ्या देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचं निधन झालं. मंगळवारी (6 ऑगस्ट) संध्याकाळी त्यांच्या (Sushma Swaraj) छातीत दुखू लागल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एम्स रुग्णालयातील डॉक्टरांची टीम जवळपास 70 मिनीटे त्यांचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. पण त्यांची झुंज अपयशी ठरली आणि उपचारादरम्यान रात्री 11 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या अकस्मात निधनामुळे एम्सच्या दोन ज्युनिअर डॉक्टरांचे डोळे पाणावले, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली.
सुषमा स्वराज यांच्या अकाली निधानामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सुषमा स्वराज यांना रात्री जवळपास 9 वाजून 35 मिनीटांनी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी एम्समधील डॉक्टरांना अलर्ट ठेवण्यात आले होते. एम्समधील एका डॉक्टरांची टीम त्यांच्यासाठी तैनात करण्यात आली होती. सुषमा स्वराज यांना रुग्णवाहिकेने रुग्णालयात आणल्यानंतर त्यांना थेट आप्तकालीन कक्षात (ICU) दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सुषमा स्वराज यांची अवस्था पाहून त्यांना हृदयविकाराचा झटका (Cardiac Arrest) आल्याचे ओळखले.
त्यानंतर डॉक्टरांनी 15 मिनिटे त्यांना CPR आणि हार्ट पंपद्वारे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र त्यांनी कोणतीही हालचाल केली नाही. त्यानंतर सुषमा स्वराज यांना शॉक देण्यात आला. मात्र त्याचा फारसा काही परिणाम जाणवला नाही. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना काहीही यश आले नाही आणि उपचारादरम्यान रात्री जवळपास 10 वाजून 50 मिनीटांनी त्यांची प्राणज्योत मालावली.
सुषमा स्वराज या प्रभावी वक्त्या आणि उत्कृष्ट खासदार होत्या. त्यांना सर्वपक्षीयांकडून मान-सन्मान मिळाला. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात भारतीय अडकले असतील, तर त्यांना सुषमा तातडीने मदत करत असत.
सुषमा स्वराज (14 फेब्रुवारी 1952 ते 6 ऑगस्ट 2019) यांची संपूर्ण कारकीर्द
2014 ते 2019 – परराष्ट्र मंत्री
मे 2014 ते जानेवारी 2016 – प्रवासी भारतीय कार्यमंत्री
2009 ते 2014 – लोकसभेच्या विरोधीपक्ष नेत्या
जानेवारी 2003 ते मे 2004 – संसदीय कामकाज मंत्री
जानेवारी 2003 ते मे 2004 – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
सप्टेंबर 2000 ते जानेवारी 2003 – माहिती व प्रसारण मंत्री
ऑक्टोबर 1998 ते डिसेंबर 1998 – दिल्लीच्या मुख्यमंत्री
मे 2009 ते मे 2019 – खासदार (विदिशा लोकसभा मतदारसंघ)
मे 1996 ते ऑक्टोबर 1999 – खासदार (दक्षिण दिल्ली)
संबंधित बातम्या
वर्षभरात दिल्लीने गमावले तीन माजी मुख्यमंत्री, दोघींचं काही दिवसांच्याच अंतराने निधन
सुषमा स्वराज यांना किडनीदानाच्या इच्छेमुळे टीका झालेला मुस्लिम तरुण म्हणतो…
Sushma Swaraj | सुषमा स्वराज यांची पाच कामं, देश कधीही विसरणार नाही!