Hasan Mushrif : ‘मविआ’च्या निर्णयाला स्थगिती यामध्ये राजकारण..! एकनाथ शिंदेवर ओढावलेली नामुष्की मुश्रिफांनी सांगितली

जनतेमधून निवडूण आलेले सरपंच हे सदस्यांना विचारात न घेताच निर्णय घेतात. गावस्तरावर मनमानी कारभार होतो व त्याचा विकासावरही परिणाम होतो. त्यामुळे सदस्यातून सरपंचाची निवड हा निर्णय घेण्यात आला होता. शिवाय याबाबतचा प्रस्ताव त्यावेळी एकनाथ शिंदे यांनीच ठेवला होता. त्यानुसारच तो निर्णय झाला. यावर आता फेरविचार होणे गरजेचे असल्याचे मुश्रीफ म्हणाले आहेत.

Hasan Mushrif : 'मविआ'च्या निर्णयाला स्थगिती यामध्ये राजकारण..! एकनाथ शिंदेवर ओढावलेली नामुष्की मुश्रिफांनी सांगितली
माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 1:48 PM

कोल्हापूर : (MVA) महाविकास आघाडी सरकारने कोणते राजकीय हीत साधण्यासाठी निवडणुकांमध्ये बदल केला नव्हता तर जे व्यवहार्य आहे ते पाहूनच निर्णय घेतल्याचे माजी ग्रामविकास मंत्री (Hasan Mushrif) हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे. मात्र, सध्या राज्यात उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे राजकीय हेतूने महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय मोडीत काढत आहेत. मात्र, याची अंमलबजावणी आणि परिणाम याचाही अभ्यास होणे गरजेचे असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये (Eknath Shinde) शिंदे सरकराने घेतलेल्या निर्णयावरुन विरोधकांकडून टीका केली जात आहे. जनतेमधून लोकप्रतनिधी निवडला तर गाव स्थरावर होणाऱ्या परिणामांचा कोणताही अभ्यास या सरकारने केला नाही. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच मांडलेल्या प्रस्तावावरुन सदस्यातून सरपंच हा निर्णय झाल्याचेही मुश्रीफ म्हणाले. आता त्यांच्यावर ही नामुष्की ओढावली असल्याने कदाचित त्यांनी आपल्या विचारात आणि निर्णयात बदल केल्याचा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

‘तो’ तर हा शिंदे यांचाच प्रस्ताव

जनतेमधून निवडूण आलेले सरपंच हे सदस्यांना विचारात न घेताच निर्णय घेतात. गावस्तरावर मनमानी कारभार होतो व त्याचा विकासावरही परिणाम होतो. त्यामुळे सदस्यातून सरपंचाची निवड हा निर्णय घेण्यात आला होता. शिवाय याबाबतचा प्रस्ताव त्यावेळी एकनाथ शिंदे यांनीच ठेवला होता. त्यानुसारच तो निर्णय झाला. यावर आता फेरविचार होणे गरजेचे असल्याचे मुश्रीफ म्हणाले आहेत. तर बाजार समिती सभापतीच्या निवडणुकीत थेट शेतकऱ्यांचा सहभाग शक्य आहे का? हा निर्णय व्यवहार्य नाही ते शिंदे सरकारच्या लवकरच लक्षात येईल. तेव्हा त्यांना माघार घ्यावी लागणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.

निर्णय महाविकास आघाडीचा अमंलबजावणी शिंदेंकडून

नियमित पीक कर्ज अदा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनेच घेतला होता. पण मध्यंतरी दोन वर्ष कोरोनामुळे हा निधी देणे शक्य झाले नाही. पण अर्थसंकल्पात याकरीता निधीचीही तरतूद करण्यात आली आहे. हा निर्णय महाविकास आघाडीचा असून आता राज्य सरकारकडून केवळ अंमलबजावणी केली जाणार आहे. जनतेलाही माहिती आहे निर्णय कुणाचा तो. असे मुश्रीफ यांनी सांगितले आहे. त्यामुळे श्रेयासाठी घोषणा न करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा

इंधनाचे दर घटले पण फायदा काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोलरील 5 रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर 3 रुपये कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यामुळे जनतेच्या खिशावर फार मोठा सकारात्मक परिणाम होईल असे नाही. सध्याच्या दरवाढीमुळे पुन्हा दराचे गणित आहे त्याच स्टेजला येणार आहे. त्यामुळे या निर्णयामुळे सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा मिळेल असेही नसल्याचे मुश्रीफ म्हणाले आहेत. त्यामुळे शिंदे सरकारचे निर्णय जनतेच्या हितापेक्षा त्याला राजकीय रंग अधिक आहे असेही ते म्हणाले आहेत.

वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.