कोल्हापूर : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर (Atmaklesh Jagar Protest) आत्मक्लेश जागर आंदोलन केलं. कोल्हापुरातील या आंदोलनात स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) सहभागी झाले होते. गुरुवारी रात्री आठ वाजता सुरु झालेलं हे आंदोलन पहाटे सहा वाजेपर्यंत सुरु होतं. अगदी कडाक्याच्या थंडीत देखील स्वाभिमानीचे (Swabhimani Shetkari Sanghatana) कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले (Atmaklesh Jagar Protest).
रात्रभर जागरण गोंधळ करत त्यांनी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. रात्रभराच्या जागरणानंतरही कार्यकर्त्यांचा उत्साह पहाटे देखील तसाच कायम होता. या आंदोलनाच्या माध्यमातून नेहमी आक्रमक आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानीने संयमाचंही दर्शन घडवलं. पहाटे स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना शपथ घेऊन या आंदोलनाची सांगता केली.
रात्रभर आत्मक्लेष जागरण गोंधळ आंदोलन करुन आम्ही संयम आणि शिस्त दाखवून दिली. हल्लाबोल कुठे आणि कधी करायचा हे देखील आम्हाला माहीत असल्याचा गर्भित इशारा स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी यावेळी दिला. “शेतकऱ्यांच्या तीव्र भावना राज्य सरकारने केंद्रापर्यंत पोहोचवाव्यात अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुरस्कार वापसीच सत्र सुरु झालं आहे. महाराष्ट्रातील पुरस्कार विजेत्यांनी ही याचा बोध घेत आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत हे केंद्र सरकारला दाखवून द्यावं”, असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं.
शेतकरी आंदोलन आणि तीन केंद्रीय कृषी कायदे या मुद्द्यावरून देशभरात संतापाची लाट आहे. देशातील भूमिपुत्रावर त्यांनी दिल्लीत पोहोचू नये यासाठी रस्ते खोदून अडथळे निर्माण करण्यात आले. तसेच, लाठीमार आणि पाण्याचे फवारे उडवण्यात आले. यातच एक शेतकरी गुरमीत सिंग लहरा यांचा मृत्यू झाला. ते या आंदोलनामध्ये शहीद झाले. या हुतात्म्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि भूमिपुत्रांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, त्याच्या प्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी यवतमाळ शहरातील आझाद मैदान येथे 100 किमीहून आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील महागाव उमरखेड येथील शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जागर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अनेक शेतकरी सहभागी झाले होते, रात्रभर जागून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा भजन कीर्तन गात निषेध करण्यात आला. कडाक्याच्या थंडीत आंदोलनस्थळी शेतकऱ्यांनी चटणी भाकर खाऊन रात्र जागून आंदोलन केले. सरकार ने कृषी विधेयक मागे घ्यावे, अशी मागणी या आंदोलना दरम्यान करण्यात आली.
लातूरमध्येही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री जागरण-गोंधळ अंदोलन केले. महात्मा गांधी चौकात झालेले हे अंदोलन रात्रभर चालले. केंद्र सरकारविरोधी घोषणा देत कार्यकर्त्यांनी रात्र जागून काढली. या आंदोलनाला खासकरुन हलगी आणि गोंधळी बोलवण्यात आले होते.
बीडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रात्री जागरण-गोंधळ करत ठिय्या आंदोलन केले. जिल्हाधिकारी काचेरीसमोर स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी आज पहाटे 5 वाजेपर्यंत जागरण आंदोलन करत ठिय्या घातला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी कराडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेने रातभर आत्मक्लेश आंदोलन केले. रात्रभर जागुन कराड तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तालुका अध्यक्ष विकास पाटील यांच्या नेतृत्वाखाली जागरण गोंधळ घालत आत्मक्लेश आंदोलन केले (Atmaklesh Jagar Protest).
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्याच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवत जागर आंदोलन सुरु केलं. नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रभर शेतकऱ्यांनी जागर आंदोलन केलं. केंद्राच्या कायद्याविरोधात दिल्लीत आमचे शेतकरी इतक्या थंडीत रस्त्यावर आले. त्यांना समर्थन म्हणून राज्यभर रात्री जागर करत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकऱ्यांनी सांगितले. सरकारला जाग यावा म्हणून जागर करत असल्याचे आंदोलकांनी सांगितलं.
राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून अकोला जिल्हातल्या मूर्तिजापूर तालुक्यातील पातूर नंदापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावात जागर गोंधळ आंदोलन केले.
शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ अमरावतीत पंचवटी चौकात असलेल्या स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रात्रभर आत्मक्लेश जागर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात भजन कीर्तन करण्यात आले. तर शेतकरी आठ दिवसांपासून रात्रंदिवस कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारला सुबुद्धी देवो, असेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणा लावत कृषी विधेयक मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या वतीने बारामतीतील प्रशासकीय भवनासमोर आत्मक्लेष जागर आंदोलन करण्यात आलं. टाळ मृदंगाच्या गजरात भजन गात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला..
दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रात्री उशिरापर्यंत सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजु शेळके यांच्यासह कार्यकर्त्यांनी जागरण करत भजन कीर्तन करत अनोखे आंदोलन केले. येत्या दोन दिवसात केंद्र सरकारने दखल घेतली नाही तर महाराष्ट्रातील शेतकरी दिल्लीत जाऊन झोपी गेलेल्या केंद्र सरकारला जागे करणार असल्याचा इशारा यावेळी राजु शेळके यांनी दिला आहे.
महाराष्ट्रातही शेतकरी आंदोलनाचा वणवा पेटला; चांद्यापासून बांद्यापर्यंत शेतकऱ्यांचा आसूड कडाडला!https://t.co/GvxIsK6jJH#FarmersProtest #FarmerAgitation #maharashtra #maharashtrafarmer #farmer
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 3, 2020
Atmaklesh Jagar Protest
संबंधित बातम्या :
पंजाबमधील खेळाडूंचा शेतकरी आंदोलनाला भक्कम पाठिंबा, कृषी कायद्याविरुद्ध ‘अवॉर्ड वापसी’ मोहीम!य
कृषी कायद्यातील सर्वाधिक वादग्रस्त क्लॉज कोणता?; पी. साईनाथ म्हणतात…