स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांना 3 महिने तुरुंगवास, 15 हजार दंड! कारण काय?

आमदार देवेंद्र भुयार यांनी पंचायत समिती सदस्य असताना 2013 साली शेतकऱ्यांच्या ज्वारी संदर्भात तीव्र आंदोलन केलं होतं. त्यावेळी दाखल गुन्ह्यात भुयार यांना कलम 353 अंतर्गत अमरावती जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. भुयार यांनी त्यावेळी तत्कालीन तहसीलदार राम लंके यांच्या विरोधात वरुड तहसील कार्यालयावर आंदोलन केलं होतं.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांना 3 महिने तुरुंगवास, 15 हजार दंड! कारण काय?
आमदार देवेंद्र भुयार यांना 3 महिने तुरुंगवासाची शिक्षा
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 8:03 PM

अमरावती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांना आज न्यायालयाने एका प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. भुयार यांना 3 महिन्याचा तुरुंगवास आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आमदार देवेंद्र भुयार यांनी पंचायत समिती सदस्य असताना 2013 साली शेतकऱ्यांच्या ज्वारी संदर्भात तीव्र आंदोलन केलं होतं. त्यावेळी दाखल गुन्ह्यात भुयार यांना कलम 353 अंतर्गत अमरावती जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. भुयार यांनी त्यावेळी तत्कालीन तहसीलदार राम लंके यांच्या विरोधात वरुड तहसील कार्यालयावर आंदोलन केलं होतं. (MLA Devendra Bhuyar sentenced to 3 months imprisonment)

नेमकं प्रकरण काय?

घटनेच्या दिवशी सुवर्ण जयंती राजस्व अभियान याची यशोगाथा तयार करत असताना देवेंद्र भुयार हे काही लोकांना घेऊन सभागृहात आले आणि तावातावाने बोलू लागले की, घटनेच्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शासकीय ज्वारी खरेदी केंद्र उशिरापर्यंत का बंद आहे व तुम्ही माझा फोन का काटला? असा प्रश्न विचारला. तसंच तत्कालीन तहसीलदार यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आणि मारण्याची धमकी दिल्याचा आरोप देवेंद्र भुयार यांच्यावर करण्यात आला होता.

भुयार यांच्या पोस्टवरुन वाद

काही दिवसांपूर्वी आमदार देवेंद्र भुयार यांच्या एका पोस्टवरुन चांगलाच वाद रंगला होता. बकरी ईदच्या शुभेच्छा पोस्टमध्ये आमदार भुयार यांनी गाईचे फोटो टाकले असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. भुयार यांच्या या कृतीचा निषेध म्हणून वरुडमधील त्यांच्या कार्यालयावर बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि भाजपने मोर्चा काढत भुयार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती.

इतर बातम्या :

Video : चुकीला माफी नाही, पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्याच्या पाठीवर दणका! नेमकं कारण काय?

18 वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधार-पॅनकार्ड, शाळा-महाविद्यालयाचे ओळखपत्र आवश्यक

MLA Devendra Bhuyar sentenced to 3 months imprisonment

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.