Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raju Shetty : राजकीय पक्षांनी जनतेचा विश्वास गमावला, स्वाभिमानीचा ‘एकला चलो रे चा नारा’..! आगामी निवडणुकांमध्ये नेमका बदल काय?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील पदाधिकाऱ्यांची बैठक कराड येथे पार पडली आहे. सध्याच्या राजकीय परस्थितीवर संघटनेतील पदाधिकारी व राजू शेट्टी यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर आता राज्यातील सर्व निवडणुका ह्या स्वतंत्रच लढायच्या. कोणत्याही राजकीय पक्षाला जवळ घेऊन निवडणुक लढायची नाही. राज्यातील सर्वच पक्षांनी जनतेचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे एक नवा पर्याय म्हणून जनतेसमोर जाणे गरजेचे असल्याचे मत पदाधिकारी यांनी व्यक्त केले आहे.

Raju Shetty : राजकीय पक्षांनी जनतेचा विश्वास गमावला, स्वाभिमानीचा 'एकला चलो रे चा नारा'..! आगामी निवडणुकांमध्ये नेमका बदल काय?
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 4:20 PM

कराड : राज्यातील (Political affairs) राजकीय घडामोडीनंतर आता संघटनाही आपल्या विस्तारावर भर देणार आहेत. गेल्या महिन्याभरापासून राज्यातील घडामोडीनंतर सर्वसामान्य जनतेचा राजकीय पक्षावरील विश्वास उडाला आहे. पक्षाने वेळोवेळी बदलेली भूमिका यामुळे भ्रमनिराश झाला आहे. त्यामुळे कुण्या पक्षाबरोबर जाण्यापेक्षा आगामी काळात (Swabhimani Shetkari Sanghtna) स्वाभिमानी शेतकरी संघटना ही स्वतंत्रपणे लढणार आहे. राज्यात आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे स्वाभिमानीचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. त्यामुळे स्वत:चे अस्तित्व वाढणार असून शेतकऱ्यांसह सर्वांचेच प्रश्न मार्गी लावण्याची संधी संघटनेतील पदाधिकाऱ्यांना मिळणार असल्याचे (Raju Shetty) राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.

कार्यकरणी बैठकीत निर्णय

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील पदाधिकाऱ्यांची बैठक कराड येथे पार पडली आहे. सध्याच्या राजकीय परस्थितीवर संघटनेतील पदाधिकारी व राजू शेट्टी यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर आता राज्यातील सर्व निवडणुका ह्या स्वतंत्रच लढायच्या. कोणत्याही राजकीय पक्षाला जवळ घेऊन निवडणुक लढायची नाही. राज्यातील सर्वच पक्षांनी जनतेचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे एक नवा पर्याय म्हणून जनतेसमोर जाणे गरजेचे असल्याचे मत पदाधिकारी यांनी व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न हे संघटनेने हातळल्याने स्थानिक पातळीवर संघटन तर आहेच पण त्याचा उपयोग करुन घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

गटाची मदत मात्र पक्षापासून दूर

आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना हे उमेदवार देणार उभा करणार आहे. मात्र, हे करीत असताना कोणत्याही राजकीय पक्षाची मदत घेतली जाणार नाही. वेळप्रसंगी स्थानिक पातळीवरील गट हे संघटनेत सहभागी करुन घेतले जातील पण पक्षांना मात्र दूर ठेवले जाणार आहे. जनतेमध्ये राजकीय पक्षांना घेऊन चीड निर्माण झाली आहेत. त्याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न हा स्वाभिमानीचा राहणार आहे.

जनतेच्या प्रश्नांची जाणीव

स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांच्या हितासाठी राबलेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नाची जाण या संघटनेतील प्रत्येकाला आहे. आता निवडणुकांमध्ये स्थानिक समस्या हाच मुद्दा राहणार आहे. शिवाय जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी जनतेचा भ्रमनिराश केला आहे. मतदार आणि राजकीय पक्ष यांच्यातील अंतर वाढले असून त्याचा फायदा स्वाभिमानी संघटनेला त्याचा फायदा होईल असा विश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.