Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही आमदारकी स्वीकारावी, ही शेतकऱ्यांची भावना, राजू शेट्टी यांना महिला प्रदेशाध्यक्षाचं रक्ताने लिहिलेलं पत्र

राजू शेट्टी यांच्या समर्थनार्थ स्वाभिमानीच्या महिला प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांनी रक्तानं पत्र लिहिलं (Swabhimani Shetkari Sanghatana Women activist Letter to Raju Shetti) आहे.

तुम्ही आमदारकी स्वीकारावी, ही शेतकऱ्यांची भावना, राजू शेट्टी यांना महिला प्रदेशाध्यक्षाचं रक्ताने लिहिलेलं पत्र
Follow us
| Updated on: Jun 19, 2020 | 8:07 PM

कोल्हापूर : माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे नाव विधानपरिषदेसाठी निश्चित झालं आहे. राजू शेट्टी यांच्या समर्थनार्थ स्वाभिमानीच्या महिला प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांनी रक्तानं पत्र लिहिलं आहे. “तुम्ही आमदारकी स्वीकारावी ही तमाम शेतकऱ्यांची भावना आहे. पद असो किंवा नसो तुम्ही ढासळू नका,” अशी भावनिक साद पूजा मोरे यांनी राजू शेट्टींना घातली आहे. “शेतकऱ्यांसाठी रक्त सांडण्याचा तुमचा विचार जिवंत राहिला पाहिजे,” यासाठी रक्ताने पत्र लिहिल्याचा खुलासाही पूजा मोरे यांनी केला आहे. (Swabhimani Shetkari Sanghatana Women activist Letter to Raju Shetti)

“साहेब, आपल्या आमदारकीवरुन महाराष्ट्रात उलट-सुलट चर्चा चालू आहेत. याकाळात तुम्हाला फोन करण्याची माझी हिंमत झाली नाही. आपण आमदारकी स्वीकारावी ही पदाधिकारी म्हणून माझी इच्छा आहे. पण महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांची देखील आहे. या भावना आपण लक्षात घेऊन आपला आवाज विधानसभेत पोहोचावा, ही आमची इच्छा आहे. पद असो नसो मी आपल्याला सोबत आहे. फक्त तुम्ही ढासळू नका. सेनापतीच ढासळला तर आमचं अर्ध अवसान गळतंय. आपण लढू साहेब,” असे पूजा मोरे यांनी पत्रात लिहिलं आहे.

“हे पत्र रक्ताने यासाठी लिहिलं, कारण शेतकऱ्यांसाठी रक्त सांडण्याचा तुमचा विचार जिवंत राहिला पाहिजे. ही चळवळ टिकली पाहिजे आणि वाढली पाहिजे,” असेही पूजा मोरे यांनी पत्रात म्हटलं आहे.

“संघटनेतील पदाधिकाऱ्यांना ही मला आवाहन करायचं आहे, फक्त एका आमदारकीसाठी राजीनामे देणारे आपण नाही. आपण अजून ताकतीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहू. आपल्याला साहेबांचा विचार सोडून जमणार नाही. त्यात सर्व शेतकऱ्याचं हित आहे,” असेही त्या म्हणाल्या.

राजू शेट्टी राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधानपरिषदेवर

राज्यपाल नियुक्त जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोट्यातून माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना विधानपरिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यपाल नियुक्त 12 जागांची निवड होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या कोट्यातील 4 पैकी एक जागा राजू शेट्टींना देण्यात येणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान ठरल्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानीला विधानपरिषदेची एक जागा देणार आहे.  (Swabhimani Shetkari Sanghatana Women activist Letter to Raju Shetti)

संबंधित बातम्या : 

Raju Shetti Upset | घरच्या कटारीचे घाव जिव्हारी, नात्यात अंतर पडत असेल तर विधानपरिषदेची ब्याद नकोच, राजू शेट्टी उद्विग्न

गोविंद बागेत ठरलं, राजू शेट्टी राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधानपरिषदेवर

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.