Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sadhvi Saraswati : काश्मीर फाईल थांबण्यासाठी तलवारी बाळगा, साध्वी सरस्वतींचे तरूणाईला आवाहन

धुळ्यात (Dhule) रामनवमीचा उत्साह मोठ्या जल्लोषात पार पडला. रामनवमीच्या कार्यक्रमानिमित्त धर्म सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी सरस्वती (Sadhvi Saraswati) यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमा दरम्यान साध्वी सरस्वती यांनी धुळेकरांना संबोधित करत असताना वादग्रस्त विधान केले आहे.

Sadhvi Saraswati : काश्मीर फाईल थांबण्यासाठी तलवारी बाळगा, साध्वी सरस्वतींचे तरूणाईला आवाहन
काश्मीर फाईल थांबण्यासाठी तलवारी बाळगाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 2:43 PM

धुळे – धुळ्यात (Dhule) रामनवमीचा उत्साह मोठ्या जल्लोषात पार पडला. रामनवमीच्या कार्यक्रमानिमित्त धर्म सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी सरस्वती (Sadhvi Saraswati) यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमा दरम्यान साध्वी सरस्वती यांनी धुळेकरांना संबोधित करत असताना वादग्रस्त विधान केले आहे. कश्मीर फाईल या विषयाला अनुसरून “धुळ्यात देखील दुसऱ्या कश्मीर फाईलची (The Kashmir Files) पुनरावृत्ती ना होवो यासाठी एक लाख रुपयाचा मोबाईल, लॅपटॉप (laptop) हातात बाळगणाऱ्यांनी एक हजार रुपयाची तलवार देखील हातात ठेवावी. असं शस्त्र ठेवणे तर आपल्या हिंदूंची शान आहे.” असे म्हणत साध्वी सरस्वती यांनी हिंदु तरुणांना तलवार हातात बाळगण्याचे आवाहन केले आहे. साध्वी सरस्वती यांच्या या वादग्रस्त विधानाचे राज्यात पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

शरद पवार यांनी सुध्दा काश्मीर फाईल्सबाबत विधान केले

काश्मीर फाईल्सबाबत रोज नवी विधाने केली जातात. राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सुध्दा काश्मीर फाईल्सबाबत विधान केले आहे. ते सध्या अमरावती दौऱ्यावर आहेत. कश्मिर फाईल्सच्या निमित्ताने समाजात अस्वस्थता निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. ज्याच्या हातात सध्या सत्ता आहे, त्यांनी काश्मीर फाईल्स आवर्जुन पाहायला हवा अशी खंत शरद पवारांनी बोलून दाखवली. विश्व हिंदू परिषदेच्या साध्वी सरस्वती यांच्या वक्तव्याने एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

वादग्रस्त वक्तव्यामुळं अधिक चर्चेत

विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी सरस्वती या आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळं अधिक चर्चेत असतात. काल सुध्दा त्यांनी धुळ्यात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्या केलेल्या वक्तव्याची राज्यात चर्चा आहे. दुसरा कश्मिर फाईल्स रोखण्यासाठी तरूणांनी तलवारी बाळगायला हवी असं त्यांनी वक्तव्य केलं आहे. धुळ्यात बोलत असताना त्या म्हणाल्या की एक दिवस आपल्याला सुध्दा पळवलं जाईल.त्यावेळी तम्हालाही विचारण्यात येईल, की हिंदूंनी ब्राम्हणांवर तलवार का नाही उचलली ? आपल्या हक्कासाठी लढाई का नाही केली ? आपण युद्ध का नाही केले ? हीच स्थिती आपलीही होऊ शकते. असंही त्या म्हणाल्या. त्याच्या विधानाचे आता राज्यात अनेक ठिकाणी पडसाद उमटायला सुरूवात केली आहे.

Mallikarjuna Kharge: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांची ईडीकडून चौकशी सुरू, नेमकं काय आहे प्रकरण?

Gold Silver Rates Today: सोन्याचे दर 52 हजारच्या पार! तर चांदीही महागली, नेमके आजचे दर काय?

जळगाव स्थानकावर अहमदाबाद – बरौनी एक्स्प्रेसच्या एसी डब्यातून निघाला धूर अन् जाळ; मोठा अनर्थ टळला

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.