Tanaji Sawant : “तानाजी सावंत पैशाने माजलेला बोकड, ठोकल्याशिवाय राहणार नाही”, सोलापुरातले शिवसैनिक आक्रमक

बोलता बोलता एका शिवसैनिकाने सांगितलं की आम्हाला तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना आडवायचं होतं, मात्र गाडीत उदय सामंत निघाले, त्यानंतर आता सोलापुरातल्या शिवसैनिकांनीही तानाजी सावंत यांच्याबाबत अशाच आक्रमक प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि सणसणीत इशाराही दिला आहे.

Tanaji Sawant : तानाजी सावंत पैशाने माजलेला बोकड, ठोकल्याशिवाय राहणार नाही, सोलापुरातले शिवसैनिक आक्रमक
"तानाजी सावंत पैशाने माजलेला बोकड, ठोकल्याशिवाय राहणार नाही", सोलापुरातले शिवसैनिक आक्रमकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 3:13 PM

सोलापूर : राज्यातल्या बंडाळीने (Cm Ekanath Shinde) तापलेला माहोल अजूनही शांत व्हायचं नाव घेत नाहीये. कारण काल रात्री पुण्यात माजी मंत्री आणि शिंदे गटातील आमदार उदय सामंत (Uday Samant Car Attacke) यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून जबरदस्त हल्ला चढवण्यात आला. या हल्ल्यात उदय सामंत यांच्या गाडीची काच फुटली. त्यानंतर सामंत यांनी कोथरूड पोलिसात दाखल होत या हल्लेखोरांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर यावर दोन्ही बाजूच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या या शिवसैनिकांच्या भावना आहेत, अशा प्रतिक्रिया महाविकास आघाडीतील नेते देऊ लागले. तर हा पाठीत वार आहे, अशा प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदारांकडून येऊ लागल्या. मात्र यावेळी बोलता बोलता एका शिवसैनिकाने सांगितलं की आम्हाला तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना आडवायचं होतं, मात्र गाडीत उदय सामंत निघाले, त्यानंतर आता सोलापुरातल्या शिवसैनिकांनीही तानाजी सावंत यांच्याबाबत अशाच आक्रमक प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि सणसणीत इशाराही दिला आहे.

ठोकल्याशिवाय राहणार नाही

तानाजी सावंत यांच्यावर प्रतिक्रिया देताना शिवसैनिक म्हणाले, पैशाने माजलेला बोकड म्हणजे तानाजी सावंत आहे. त्याची पाच हजार कोटीची संपत्ती आहे. त्यावर ईडी कारवाई का करत नाही. ज्या तानाजी सावंताला पक्षप्रमुखांनी विधान परिषदेवर आमदार केले, मंत्री केले, तो सावंत विचारतो की, कोण आदित्य ठाकरे? या तानाजी सावंताला सोलापुरातील शिवसैनिक चप्पलने मारल्याशिवाय राहणार नाही, तीवरे धरण हे खेकड्यांनी फोडलं असं म्हणणारा तानाजी सावंत याला फक्त पैशाची मस्ती आहे, अशी घणाघाती टीका यावेळी शिवसैनिकांनी केली आहे.

गद्दारांना सोडणार नाही

तर शाहजीबापू पाटील यांच्यावरही त्यांनी सडकून टीका केली आहे. शहाजीबापू पाटील हे स्वतःला छत्रपतींचा वंशज समजतात आणि त्यांना बायकोला साडी घेता येत नाही. असे लोक पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर आरोप करत असतील तर शिवसेना गप्प बसणार नाही त्यांच्या घरोघरी जाऊन जागृती करणार आहे. या लोकांना निवडणुकीत पाडणार तर आहोतच मात्र यांना सोळंकी प्रयोग करून सोडणार, तर  या गद्दारांपैकी कोणीही सोलापुरात आले तर सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील शिवसैनिक त्यांना ठोकल्याशिवाय राहणार नाही, असाही इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.

यांना पाण्यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दिसताहेत

तसेच आदित्य यांच्या सभांना मिळणारा पाठिंबा पाहून यांच्या पायाखालची वाळू सरकलीय. मोघलांना ज्याप्रमाणे सगळीकडे संताजी धनाजी दिसत होते तसेच यांना उध्दव साहेब आणि आदित्य ठाकरे दिसत आहेत. पुढील काळात या चाळीस लोकांना मतदारसंघातील लोक ठोकल्याशिवाय राहणार नाहीत, असेही शिवसैनिक म्हणाले आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.