Tanaji Sawant : आमच्यावरील हल्ल्याचे उत्तर आठ दिवसात मिळेल; तानाजी सावंतांचा शिवसेनेला इशारा

Tanaji Sawant :आम्हाला तानाजी सावंतवर हल्ला करायचा होता. अशी स्टेटमेंट त्यांनी दिली. म्हणजे तुम्ही काय करणार आहात? आम्ही लोकशाहीच्या मार्गाने विचार बदलला म्हणून मर्डर करणार आहात का?

Tanaji Sawant : आमच्यावरील हल्ल्याचे उत्तर आठ दिवसात मिळेल; तानाजी सावंतांचा शिवसेनेला इशारा
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 7:36 AM

पुणे: शिंदे गटाचे आमदार उदय सामंत (uday samant) यांच्यावर काल रात्री हल्ला करण्यात आला. हा हल्ला शिवसैनिकांनी (shivsena) केल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्यावर हल्ला करायचा होता. पण तानाजी सावंतांवर (tanaji sawant)  हल्ला केला गेल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यानंतर उदय सामंत यांनी कडक प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही शांत आहोत. याचा अर्थ आम्ही हतबल आहोत असं कुणी समजू नये. आमच्या संयमाचा अंत कुणी पाहू नये. आम्हीही चार हात करायला तयार आहोत, असा इशारा उदय सामंत यांनी दिला आहे. तर मी आज कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. माझ्यावरील हल्ल्याची रिअॅक्शन चार आठ दिवसात मिळेल. काय होईल मला माहीत नाही. पण याची रिअॅक्शन माझे कार्यकर्ते देतील, असा इशारा तानाजी सावंत यांनी दिला आहे.

उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाल्याने सामंत आणि तानाजी सावंत अत्यंत आक्रमक झाले आहेत. दोघांनीही तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. या प्रकरणी पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. माझी गाडी कोणत्याही शिवसैनिकांनी फोडली नाही. माझी गाडी सिग्नलला उभी राहिली. माझी गाडी थांबल्या नंतर उजव्या बाजूला दोन गाड्या होत्या. त्यांच्या हातात बेसबॉलच्या स्टिक होत्या. हातात सळ्या होत्या, हाताला दगड बांधले होते. आज ज्यांनी भाषण केलं होतं. त्यानंतरचा हा उद्रेक आहे. उदय सामंतवर हल्ला करायचा नव्हता. आम्हाला तानाजी सावंतवर हल्ला करायचा होता. अशी स्टेटमेंट त्यांनी दिली. म्हणजे तुम्ही काय करणार आहात? आम्ही लोकशाहीच्या मार्गाने विचार बदलला म्हणून मर्डर करणार आहात का? आम्ही शांत आहोत. असहय आणि हतबल नाही, असा इशारा उदय सामंत यांनी दिला.

हे सुद्धा वाचा

हल्ला करायची ही आमची संस्कृती नाही

आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं की, एखाद्याने शिवीगाळ केली तर ती ओवी समजून गप्प बसा. आमचा संयम सुटला तर आमचे कार्यकर्तेही आक्रमक होतील. आमचे कार्यकर्तेही असं करू शकतात, असा इशारा देतानाच विनायक राऊतांनी सांगितलं ते शिवसैनिक नव्हते. मग उदय सामंत आणि तानाजी सावंत यांना मारण्यासाठी कुणी सुपारी दिली? तोच एफआयआर दाखल करण्याता आला आहे. काही लोकांनी विचारलं तुम्ही घाबरले का? उलट आम्ही 50 लोक अधिक एकत्र आलो. आम्ही 12-12 तास काम करत होतो, शिंदेसाठी आता 18-18 तास काम करू. आम्ही काय आहे हे आम्ही दाखवून देऊ. मला काही इजा झाली नाही. आईवडीलांच्या आशीर्वादाने बचावलो. पण ही काही लोकशाही नाही. सोज्वळ चेहरे करून आमचे आईबाप काढायचे, आमचे आई वडील विकले म्हणून सांगायचे आणि आमच्यावर हल्ला करायचे ही आमची राजकीय संस्कृती नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

फुटकळ लोकांना घाबरत नाही

झालं ते बरं झालं. यांचे चेहरे उघडे झाले. आमच्याविरोधात गेले तर ठार मारू हे लोकांना दिसलं आहे. पण आम्ही घाबरणार नाही. चार हात करायला तयार आहोत. पण आमच्यावर संस्कार आहेत. त्यामुळे या भानगडीत आम्ही पडणार नाही. या फुटकळ लोकांना आम्ही घाबरत नाही. भीकही घालत नाही. आम्ही शांत आहोत याचा अर्थ आमच्या संयमाचा अंत पाहू नये. मी एफआयआर दाखल करण्यात आलो. आमचे पोलीस आणि ड्रायव्हरने माहिती दिली आहे. आम्हाला न्याय मिळेल. पोलिसांना दोष देणार नाही. पोलिसांवरही ताण असतो. सभेला जाताना हातात स्टिक आणि दगड कसे असतात? कारण कुणी तरी त्यांना तसं यायला सांगितलं असेल, असा दावा त्यांनी केला.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.