Video: भरसभेत शहाजी बापूंचे डोळे पाणावले, त्यांना गहीवरुन आले आणि…
आईच्या कडेवर असलेल्या लहान मुलांच्या हृदयाला होल असतो. या मुलांच्या हृदयाचे ऑपरेशन करुन करुन त्यांना जीव दान देऊन मातांचे दुख: समजून घेणारे हे मुख्यमंत्री आहेत हे सांगताना शहाजी बापू पाटील यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि त्यांना भरुन आले.
औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) यांच्या औरंगाबादमधील बहुचर्चित सभेची सुरुवात आमदार शहाजी बापू पाटील यांच्या भाषणाने झाली. भाषण करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा लेखाजोखा मांडताना आमदार शहाजी बापू पाटील(Shahaji Bapu Patil) यांचे डोळे पाणावले आणि त्यांना गहीवरुन आले.
आमचा नेता दणकट आणि खंबीर आहे असं म्हणत शहाजी बापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना आम्ही फाईल हातात घेऊन फिरत होतो. मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासाला गती दिली आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आम्ही एक शब्द काढला नाही. पण अडीच वर्षात काय झाल आमच एक काम होत नव्हत. पाणी- रस्ते कोणतेही निधी मिळत नव्हते. मुख्यमंत्री सगळ्यांना न्याय देत आहेत. सर्व सामान्यांपासून माता-भगिनी आणि लहान लेकरांचा विचार करणारे हे मुख्यमंत्री आहेत.
आईच्या कडेवर असलेल्या लहान मुलांच्या हृदयाला होल असतो. या मुलांच्या हृदयाचे ऑपरेशन करुन करुन त्यांना जीव दान देऊन मातांचे दुख: समजून घेणारे हे मुख्यमंत्री आहेत हे सांगताना शहाजी बापू पाटील यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि त्यांना भरुन आले.
यावेळी शहाजी बापू पाटील यांनी शिवसेनेवर सडकून टीका केला. महाराष्ट्राला सुखाने राजकारण करु द्या. महाराष्ट्रात शांतता नांदू द्या. मुख्यमंत्री शिंदे महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीशी उभे आहेत असं शहाजी बापू पाटील म्हणाले. शिवसेनेचा मुख्यमंत्री होता आताही शिवसेनाचा मुख्यमंत्री आहे असेही ते म्हणाले.