बिहारच्या मैदानात तेजस्वी, तर आयपीएलच्या मैदानात सूर्यकुमार, यादवांवर विजयाची भिस्त

बिहारच्या निवडणुकीत महागठबंधन यांना तेजस्वी यादव यांच्याकडून तर आयपीएलच्या मैदानात मुंबईला तुफान फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यकुमार यादवकडून अपेक्षा आहेत.

बिहारच्या मैदानात तेजस्वी, तर आयपीएलच्या मैदानात सूर्यकुमार, यादवांवर विजयाची भिस्त
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 10:48 AM

मुंबई : एकीकडे बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल तर दुसरीकडे इंडियन प्रीमियर लिग अर्थात आयपीएलची फायनल (ipl 2020 final) असं चित्र आज दिवसभर पाहायला मिळणार आहे. बिहारच्या निवडणुकीत तेजस्वी यादव यांची RJD आणि काँग्रेस यांचे महागठबंधन विरुद्ध नितीश कुमार यांचे JDU आणि भाजप यांची एनडीए अशी लढत होत आहे. तर आयपीएलच्या मैदानात रोहित शर्माची मुंबई इंडियन्स विरुद्ध श्रेयस अय्यरची दिल्ली कॅपिटल्स (MI vs DC) यांच्यात लढत होत आहे. (Tejashwi Yadav and Suryakumar Yadav performance IPL and Bihar election)

बिहारच्या निवडणुकीत महागठबंधन यांना तेजस्वी यादव यांच्याकडून अपेक्षा आहेत. तर आयपीएलच्या मैदानात मुंबईला तुफान फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यकुमार यादवकडून अपेक्षा आहेत. बिहारच्या प्रचारात तेजस्वी यादव यांची हवा होती. तर आयपीएलच्या मैदानात सूर्यकुमार यादवचा झंझावात पाहायला मिळाला.

सूर्यकुमार यादवची आयपीएलमधील कामगिरी

सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्सचा मधल्या फळीतील विश्वासू खांब आहे. मुंबईसाठी प्रत्येक सामन्यांत धावांचा पाऊस पाडणारा हुकुमी एक्का अशी त्याची ख्याती झाली आहे. सूर्यकुमारनं या आयपीएलमध्ये 15 सामने खेळले आहेत. आणि यात त्यानं 148 च्या स्ट्राईक रेटनं तब्बल 461 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 4 अर्धशतकांचा समावेश आहे.

या संपूर्ण हंगामात सूर्यकुमारनं 10 उत्तुंग षटकार आणि तब्बल 60 चौकार ठोकले आहेत. मुंबईला यशशिखरावर पोहोचवण्यात सूर्यकुमारचा मोलाचा वाटा आहे. सूर्यकुमारचा जन्म वाराणसीचा पण शिक्षणही आणि सगळं करिअर मुंबईत. वडील भाभा अणुसंशोधन केंद्रात नोकरीला. चेंबूरला राहणाऱ्या सूर्यकुमारला क्रिकेटचं वेड लागलं आणि शाळेत असल्यापासूनच त्यांनी क्रिकेटला सोबती केलं.

सूर्यकुमारचे काका विनोद कुमार हेच त्याचे पहिले कोच. मुंबईत सूर्यकुमार वेंगसरकर क्रिकेट अकादमीत सामील झाला. 2016 मध्ये सूर्यकुमार डान्स कोरिओग्राफर असलेल्या द्विशा शेट्टीसोबत विवाह बंधनात अडकला. आयपीएलमध्येच सूर्यकुमारला खेळण्याची संधी मिळाली. मात्र, सुरुवातीच्या सीझनमध्ये सूर्यकुमारचा रेकॉर्ड काही खास नव्हता. मात्र, यंदाच्या आयपीएलमध्ये सूर्यकुमार धावांचा पाऊस पाडताना दिसतोय. हाच धावांचा पाऊस मुंबईल विजय मिळवून देईल अशी अपेक्षा मुंबई इंडियन्सला आहे.

तेजस्वी यादव यांची कारकीर्द (Tejashwi Yadav)

बिहारचे राजकारण कोळून प्यायलेल्या नितीशकुमार यांच्याशी कडवी झुंज दिल्याने राजद नेते तेजस्वी यादव राष्ट्रीय राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. तेजस्वी यादव हे बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचे चिरंजीव आहेत.

फक्त इयत्ता आठवीपर्यंत शिकलेले तेजस्वी यादव हे मूळचे क्रिकेटपटू आहेत. झारखंडमधून ते रणजी करंडकासाठी खेळले आहेत. शिवाय आयपीएलमध्ये ते दिल्ली डेअरडेविल्सकडून ते खेळले आहेत.

क्रिकेटमध्ये आलेले अपयश आणि लालूप्रसाद यादव यांना तुरुंगात जावं लागल्याने तेजस्वी यांना बिहारच्या राजकारणाच्या पिचवर उतरावं लागलं. त्यांचा हा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला. 2010मध्ये त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं आणि पहिल्यांदा वडिलांसाठी प्रचार केला. त्यानंतर 2013मध्ये लालूप्रसाद यांना अटक झाल्यामुळे तेजस्वींकडे पक्षाची धुरा गेली. राजकारणात आल्यानंतरही केवळ वयाची पंचवीशी गाठलेली नसल्याने त्यांना 2014मध्ये लोकसभा निवडणूक लढवता आली नव्हती.

मात्र, 2015मध्ये राघोपूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली आणि विजयीही झाले. राजदच्या पाठिंब्याने बनलेल्या नितीशकुमार सरकारमध्ये तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री होते. मात्र, एका घोटाळ्यात तेजस्वी यांचं नाव आल्यानंतर नितीशकुमार यांनी राजदची साथ सोडून भाजपची साथ धरल्याने त्यांचं उपमुख्यमंत्रिपद अल्पजीवी ठरलं.

सध्या लालूप्रसाद यादव तुरुंगात आहेत. त्यांच्या गैरहजेरीत तेजस्वी यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतली. त्यांनी सर्वाधिक 251 प्रचारसभा घेऊन प्रचाराचं रान उठवलं होतं.

अवघ्या वयाच्या 31व्या वर्षी तेजस्वी यादव बिहारचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरणार आहेत.

(Tejashwi Yadav and Suryakumar Yadav performance IPL and Bihar election)

संबंधित बातम्या 

Photo ! ‘तेजस्वी’ बिहार! कोण आहेत लालूपुत्र तेजस्वी यादव?    

IPL 2020, MI vs DC Final Live Update : मुंबई विरुद्ध दिल्ली आमनेसामने, कोण पटकावणार विजेतेपद ?

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.