तेलंगणात विजय खेचून आणला; महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याचं नशीब फळफळलं, मोठ्या जबाबदारी शक्यता

Telangana Election Result 2023 : तेलंगणात काँग्रेसला विजय मिळाला. यात महाराष्ट्रातील एका नेत्याचा मोठा वाटा राहिला. या नेत्यावर आता मोठी जबाबदारी येण्याची शक्यता आहे. कोण आहे हा नेता? त्यांचं तेलंगणा कनेक्शन काय आहे? कोणती जबाबदारी मिळणार आहे? वाचा सविस्तर...

तेलंगणात विजय खेचून आणला; महाराष्ट्रातील 'या' नेत्याचं नशीब फळफळलं, मोठ्या जबाबदारी शक्यता
Follow us
| Updated on: Dec 05, 2023 | 12:54 PM

अक्षय मंकणी, प्रतिनिधी टीव्ही 9 मराठी, मुंबई |05 डिसेंबर 2023 : नुकतंच देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला केवळ एकाच राज्यात बहुमताचा आकडा पार करता आला. तेलंगणामध्ये काँग्रेसला यश मिळालं. यात तेलंगणातील स्थानिक नेत्यांसोबतच महाराष्ट्रातील एका नेत्याचा मोठा वाटा राहिला. त्या नेत्याचं नाव आहे माणिराव ठाकरे… माणिकराव ठाकरे यांना आता मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. येत्या काळात काँग्रेस पक्ष माणिकराव ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे.

मोठ्या जबाबदारीची शक्यता

5 राज्यांच्या विधासभेच्या निकालात भाजप पक्षाने सरशी मारली.मात्र तेलंगणा राज्यात मात्र काँग्रेसने सत्ता खेचून आणली. या तेलंगणा राज्याचे काँग्रेस प्रभारी म्हणून महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांच्यावर जबाबदारी होती. त्यांच्या नेतृत्वात तेलंगणा राज्यात निवडणूक लढली गेली. तेलंगणातील जनतेने काँग्रेसच्या रणनितीला चांगला प्रतिसाद दिला आणि सत्ताबदल हा झाला. या विजयानंतर माणिकराव ठाकरे यांना राज्यातील काँग्रेस पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत चार ठिकाणी काँग्रेसचा दारूण पराभव झाला. तर तेलंहणामध्ये मात्र काँग्रेसला बहुमत मिळालं. 119 जागांच्या या विधानसभेत 60 हा बहुमताचा आकडा आहे. इथं काँग्रेसला 64 जागांवर विजय मिळाला आहे. या विजयात माणिकराव ठाकरे यांचा मोठा वाटा राहिला.

काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची शक्यता

पाच राज्यातील विधानसभा निकालानंतर राज्यातील काँग्रेस पक्ष संघटनेत महत्त्वपूर्ण बदल होण्याची चिन्हे आहेत. पूर्ण वेळ विभाग निहाय प्रभारी नेमण्याची काँग्रेस कडून शक्यता आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी म्हणून काम पाहणारे एच. के. पाटील यांच्या जागेवर नवीन प्रभारी नेमण्यात येणार आहे.

पुढच्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी अवघे काही महिने राहिले आहेत. अशात काँग्रेस पक्षाने या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पाश्वभूमीवर काँग्रेस हायकमांडवरून महाराष्ट्र काँग्रेस मधे मायक्रो लेव्हल प्लॅनिंग करण्यात येणार आहे. यात माणिकराव ठाकरे यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.